मोदी इव्हेंट करण्यात पटाईत, आव्हाड कडाडले, चूल पेटवण्याऐवजी दिवे पेटवण्याचा उपदेश, मलिक यांची खोचक टीका
लोकांच्या जीवनात अंधार आलाय, तो दूर करण्यासाठी मोदींनी प्रकाश देण्याची गरज होती, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी ताशेरे ओढले. (NCP on Narendra Modi appeal to Light candles)
मुंबई : लोकांची चूल कशी पेटेल, यावर साहेब बोलतील, असं वाटलं होतं, मात्र त्यांनी दिवा पेटवण्याचा संदेश दिला, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. तर मोदी फक्त इव्हेंट करण्यात पटाईत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. (NCP on Narendra Modi appeal to Light candles)
वाटलं होतं लोकांची चूल पेटवण्यासंदर्भात बोलतील, परंतु साहेब दिवा पेटवण्याचा संदेश देऊन गेले. सकाळी नऊ वाजता पंतप्रधानांनी केलेल्या भाषणातून देशवासियांच्या पदरात घोर निराशा पडल्याची टीका नवाब मलिक यांनी केली.
9 बजे सुबह प्रधान मंत्री मोदी जीके भाषण से देश वासीयों के हात घोर निराशा ही लगी, सोचा था चूल्हा जलाने की बात हो गी साहब दिया जलाने का उपदेश दे गए।
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) April 3, 2020
आम्हाला वाटले, मोदी काहीतरी आधार देतील. काय उपाययोजना केल्या, याची माहिती देतील, किती औषधे, मास्क आहेत, डॉक्टरांना किती साहित्य देऊ, याची माहिती देतील. पण मोदी फक्त इव्हेंट करण्यात पटाईत आहेत. मोदी यांचा हा प्रयत्न निव्वळ मूर्खपणा आहे. लोकांच्या जीवनात अंधार आलाय, तो दूर करण्यासाठी मोदींनी प्रकाश देण्याची गरज होती, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी ताशेरे ओढले.
भारताने कोरोनाविरुद्धची लस शोधली,एकालाही मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत.कुठलाही गरीब उपाशी झोपणार नाही. असे भाषण मोदींकडून अपेक्षित होते. तर त्यांनी ह्या संकटाचाही इव्हेंट करायच ठरवल म्हणे… अंधार करा आणि बॅटरी पेटवा. देशाला इतकेही मुर्खात काढू नका. pic.twitter.com/ZDOgvQDzPK
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 3, 2020
(NCP on Narendra Modi appeal to Light candles)
I thought #modi would speak on the #COVIDー19 crisis in #India Talk about making medicine’s,mask,sanitizer available,about migrant labour and policy to help them Speak on foodgrains avilablity Instead he talks of a event in crisis Light torch and switch of lights #Madness_Modi
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 3, 2020
टाळी-थाळीनंतर पंतप्रधान आता दिवे लावण्याचा इव्हेंट करत आहेत. देशाला इव्हेंटची आवश्यकता नाही. कोव्हीड 19 शी लढण्यासाठी हॉस्पिटल, व्हेंटिलेटर आणि टेस्टिंग लॅबची गरज आहे. रोजंदार आणि स्थलांतरित कामगारांच्या जगण्यासाठी पॅकेज. हे पब्लिसिटी स्टंट थांबवा आणि काही ठोस पावले उचला, असे आवाहन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
After Taali-Thaali @PMOIndia now presenting the lighting of lamps event. The country doesn’t need an event, it needs hospitals, ventilators & testing labs to fight #COVID19 Livelihood package for daily wager and migrant worker. Stop these PR stunts & take some firm steps.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) April 3, 2020
(NCP on Narendra Modi appeal to Light candles)