डेकोरेटर व्यावसायिकांसाठी सुप्रिया सुळे मैदानात, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

त्यांनी जिम, सिनेमागृह, हॉटेल व्यावसायिक सुरु करावे, अशी मागणीही केली होती.(NCP MP Supriya Sule demand CM Uddhav Thackeray for restart decorating business) 

डेकोरेटर व्यावसायिकांसाठी सुप्रिया सुळे मैदानात, मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Follow us
| Updated on: Oct 07, 2020 | 10:59 AM

मुंबई : जिम, सिनेमागृह, हॉटेल व्यावसायिक यानतंर आता डेकोरेटर्स व्यावसायिकांसाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे मैदानात उतरल्या आहेत. “डेकोरेटर्स व्यावसायिकांवर छोटे उद्योजक आणि मजूर अवलंबून आहेत. त्यामुळे काही प्रमाणात त्यांचे काम सुरु करावे,” अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे. (NCP MP Supriya Sule demand CM Uddhav Thackeray for restart decorating business)

मुंबई(नॉर्थ-ईस्ट) डेकोरेटर्स अँड सप्लायर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींनी आज (7 ऑक्टोबर) सुप्रिया सुळेंची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या विविध मागण्याचं निवेदन दिले.

“राज्यातील मंडप डेकोरेटर्स, केटरर्स व इव्हेंट ऑर्गनायझर्स यांचा व्यवसाय या कोरोनाच्या काळात अडचणीत सापडला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विनंती आहे की, त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असणारा उद्योगाचा दर्जा त्यांना देण्याबाबत आपण सकारात्मक विचार करावा,” असे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

“उद्योगाचा दर्जा दिल्याने त्यांना कर्ज घेण्याचा मार्ग सोपा होईल. यासोबतच 50 ते 60 टक्के क्षमता असणारी मैदानेही त्यांना वापरण्याची परवानगी देण्याबाबत आपण विचार करावा. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणारे छोटे उद्योजक आणि मजूर यांचे काम काही प्रमाणात तरी पुर्ववत सुरु होईल. तरी याचा आपण अवश्य विचार करावा,” अशी विनंतीही सुप्रिया सुळेंनी केली आहे.

हेही वाचा –जिम सुरु करा, राज ठाकरे-फडणवीसांपाठोपाठ सुप्रिया सुळे यांची मागणी

दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांनी जिम, सिनेमागृह, हॉटेल व्यावसायिक पुन्हा सुरु करावे, अशी मागणी केली होती.  कोरोनाच्या संकाटामुळे राज्यातील रेस्टॉरंटचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. सध्या पार्सल्सची मुभा देण्यात आली असली, तरी ती या उद्योगाला सावरण्यासाठी पुरेशी नाही. याशिवाय अनेक रेस्टॉरंट चालकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होतं.

त्यापूर्वी राज्यातील एकपडदा थिएटरचालक आर्थिक अडचणीत आले आहेत. एकपडदा थिएटरचालकांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करुन त्यावर सकारात्मक तोडगा काढावा” असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले होते. तसेच जिम सुरु करण्याची आग्रही मागणीही सुप्रिया सुळे यांनी ट्वीटरवर केले होते.(NCP MP Supriya Sule demand CM Uddhav Thackeray for restart decorating business)

संबंधित बातम्या :

आधी जिम-थिएटर, आता ‘या’ व्यावसायिकांसाठी सुप्रिया सुळे मैदानात

सिंगल स्क्रीन थिएटर चालक आर्थिक अडचणीत, मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढावा, सुप्रिया सुळेंचे ट्वीट

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.