गोरगरीबांचा अन्नासाठी संघर्ष, केंद्राने ‘या’ निर्णयाचा पुनर्विचार करावा, सुप्रिया सुळे यांची विनंती

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामातील बफर स्टॉकच्या तांदळापासून सॅनिटायजर तयार करण्याच्या केंद्र सरकार निर्णयावर खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे (Supriya Sule requests to rethink on using rice to make sanitizer)

गोरगरीबांचा अन्नासाठी संघर्ष, केंद्राने 'या' निर्णयाचा पुनर्विचार करावा, सुप्रिया सुळे यांची विनंती
Follow us
| Updated on: Apr 21, 2020 | 4:09 PM

मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामातील बफर स्टॉकच्या तांदळापासून सॅनिटायजर तयार करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. देशातील गोरगरीब अन्नासाठी संघर्ष करत असल्याने केंद्राने निर्णयावर पुनर्विचार करावा, अशी विनंती सुळे यांनी केली आहे. (Supriya Sule requests to rethink on using rice to make sanitizer)

केंद्र सरकारने फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोडाऊनमधील बफर स्टॉकच्या तांदळापासून सॅनिटायजर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. सॅनिटायजर आवश्यक आहे, त्याचे उत्पादन करायलाच हवे. परंतु कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याने उद्भवलेल्या परिस्थितीत देशातील गोरगरीब एकीकडे अन्नासाठी संघर्ष करत आहेत, याकडे सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे.

या काळात आपले सर्वांचे प्राधान्य गरीबांचे पोट भरण्यास असायला हवे. आपण हा तांदूळ स्थलांतरीत मजूरांसाठी देऊ शकतो. आपणास विनंती आहे की, या निर्णयाचा कृपया पुनर्विचार करुन तो तांदूळ गरीबांना वाटण्यासाठी उपलब्ध करावा, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे. या ट्वीटमध्ये सुळे यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हँडलला टॅग केले आहे.

‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हात वारंवार साबणाने स्वच्छ धुण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी सॅनिटायजर सर्वांना उपलब्ध व्हावं म्हणून त्याचं उत्पादन वाढवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी केंद्राने तांदळापासून सॅनिटायजर बनवण्याचा निर्णय घेतला आहे. (Supriya Sule requests to rethink on using rice to make sanitizer)

हेही वाचा : पालघरप्रकरणी राजकारण नको, सर्व आरोपी अटकेत : शरद पवार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.