नाशिकमध्ये कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात, जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
नाशिकमध्ये कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याचं समोर आलं आहे (corona patient dead body negligence in Nashik).
नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या मृतांबाबत अत्यंत काटोकोर नियम आहेत. मात्र, नाशिकमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असतानाही 65 वर्षीय महिलेचा मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याचं समोर आलं आहे (corona patient dead body negligence in Nashik). यातून जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. विशेष म्हणजे तब्बल 7 तास या रुग्णाचा मृतदेह तिच्या फुलेनगरमधील राहत्या घरात होता.
मृत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णलयात जाऊन याविषयी जाब विचारला यानंतर डॉक्टरांनी मृतदेह पुन्हा हॉस्पिटलला आणून द्या असं सांगितलं. शेवटी जिल्हा रुग्णालयाने रात्री 1 वाजता आपलं पथक पाठवून राहत्या घरातून महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याची विल्हेवाट लावली. मात्र, तब्बल 7 तास मृतदेहासोबत राहिलेल्या कुटुंबियांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न तयार झाला आहे. आता आमच्या जीवाला धोका झाला तर याला जबाबदार कोण? असा सवाल मृत कोरोना रुग्णाचे नातेवाईक विचारत आहेत.
दरम्यान, नाशिकमध्ये रविवारी (21 जून) 108 कोरोना बाधित रुग्ण आढळले. आत्तापर्यंत येथे 156 प्रतिबंधित क्षेत्र आहेत. नाशिक शहरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1209 वर पोहचली आहे. एकूण 62 कोरोना रुग्णाचे मृत्यू झाले आहेत. उपचारानंतर बरे झाल्याने 504 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या 643 रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. नाशिक जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 2766 वर गेला आहे.
राज्यात रविवारी (21 जून) दिवसभरात कोरोनाचे 3 हजार 870 नवे रुग्ण आढळले (Maharashtra Corona Update). त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 32 हजार 75 वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात 1 हजार 591 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आतापर्यंत 6 हजार 170 रुग्णांचा मृत्यू
राज्यात आतापर्यंत एकूण 65 हजार 744 रुग्ण बरे झाले आहेत. तर 60 हजार 147 रुग्णांवर उपचार सुरु आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत 6 हजार 170 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी 170 रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज करण्यात आली आहे. तर 101 रुग्णांचा आज दिवसभरात कोरोनामुळे मृत्यू झाला.
संबंधित बातम्या :
नवदाम्पत्याकडून कोव्हिड सेंटरला 50 बेड, लग्नाचा अनावश्यक खर्च टाळत रुग्ण सेवेसाठी मदत
खासगी रुग्णवाहिकेसाठी पैसे नाही, 108 रुग्णवाहिका तब्बल 6 तासानंतर, उपचाराअभावी तरुणाचा तडफडून मृत्यू
corona patient dead body negligence in Nashik