‘हाच मिळाला का?’ बॉयफ्रेण्डची वजनावरुन खिल्ली, अभिनेत्री नेहा पेंडसेचं ट्रोलर्सना उत्तर

मुंबई : अभिनेत्री नेहा पेंडसे हिने होणाऱ्या नवऱ्याच्या वजनावरुन ट्रोल करणाऱ्या टवाळखोरांना फटकारलं (Nehha Pendse Answers Troll) आहे. ‘एखाद्याच्या वजनावरुन हिणवण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? माझ्यासाठी कोण चांगलं आणि कोण वाईट हे ठरवणारे तुम्ही कोण?’ असे खरमरीत सवाल (Nehha Pendse Answers Troll) नेहाने ट्रोलर्सने विचारले आहेत. नेहा पेंडसेने काही दिवसांपूर्वी बिजनेसमन शार्दुल बाययसोबत फोटो शेअर […]

'हाच मिळाला का?' बॉयफ्रेण्डची वजनावरुन खिल्ली, अभिनेत्री नेहा पेंडसेचं ट्रोलर्सना उत्तर
Follow us
| Updated on: Sep 16, 2019 | 12:21 PM

मुंबई : अभिनेत्री नेहा पेंडसे हिने होणाऱ्या नवऱ्याच्या वजनावरुन ट्रोल करणाऱ्या टवाळखोरांना फटकारलं (Nehha Pendse Answers Troll) आहे. ‘एखाद्याच्या वजनावरुन हिणवण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? माझ्यासाठी कोण चांगलं आणि कोण वाईट हे ठरवणारे तुम्ही कोण?’ असे खरमरीत सवाल (Nehha Pendse Answers Troll) नेहाने ट्रोलर्सने विचारले आहेत.

नेहा पेंडसेने काही दिवसांपूर्वी बिजनेसमन शार्दुल बाययसोबत फोटो शेअर केले होते. त्यावरुन, नेहा आणि शार्दुल लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं चाहत्यांनी ओळखलं होतं. काही दिवसांतच नेहाने या चर्चांवर शिक्कामोर्तब केलं. पुढच्या वर्षी महाराष्ट्रीय पद्धतीने आपण लग्न करणार असल्याची माहिती नेहाने दिली.

‘फक्त शार्दुलच नाही, तर मलासुद्धा कित्येक वेळा वाढत्या वजनावरुन चिडवलं जात होतं. प्रेक्षक म्हणून तुम्ही एखाद्या कलाकाराच्या लूक्सविषयी बोला, पण त्याला टार्गेट करु नका’ असं नेहाने बजावलं.

‘एखाद्या व्यक्तीला शारीरिक, मानसिक किंवा आरोग्याचे त्रास असू शकतात. शार्दुल तर मनोरंजन विश्वातीलही नाही. तो व्यावसायिक आहे. त्यामुळे त्याला ट्रोल करणं मूर्खपणाचं आहे. ‘हाच मिळाला का?’ किंवा ‘कोणी दुसरा मिळाला नाही का?’ असं विचारणं असभ्यपणाचं लक्षण आहे’ अशा शब्दात नेहा संताप व्यक्त करते.

अभिनेत्री नेहा पेंडसेचा साखरपुडा?

‘तो माणूस मला किती आनंदात ठेवतो, याची तुम्हाला कल्पना आहे का? माझ्यासाठी कोण चांगलं आणि कोण वाईट हे ठरवणारे तुम्ही कोण? फ्रस्ट्रेशनमधून ही नकारात्मकता येते, हे मी समजू शकते. काही जणांना लक्ष वेधून घेण्याची सवय असते, तर कोणाकडे आयुष्यात ध्येयच नसतं. इतकी वाट पाहिल्यानंतर शार्दुलच्या रुपाने मला खरं प्रेम गवसलं आहे. आणि या ट्रोल्सपुढे मी झुकणार नाही’ असं नेहाने निक्षून सांगितलं.

मिलानमधील कॅथेड्रलसमोर शार्दुलचा हात धरुन डोळ्यात डोळे घालत उभं असतानाचा फोटो नेहाने ऑगस्ट महिन्यात शेअर केला होता.

बिग बॉसच्या घरात हजेरी

नेहा पेंडसे नुकतीच ‘बिग बॉस 12’मध्ये झळकली होती. नेहाने ‘भाग्यलक्ष्मी’ या मराठी मालिकेत मुख्य भूमिका केली होती, तर ‘एकापेक्षा एक अप्सरा आली’ या डान्स रिअॅलिटी शोच्या अंतिम फेरीतही तिने मजल मारली होती. टुरिंग टॉकिज, बाळकडू, नटसम्राट अशा चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.

मराठीसोबतच हिंदी मनोरंजन विश्वातही नेहा प्रसिद्ध आहे. 1996 मधील ‘हसरतें’ या हिंदी मालिकेत नेहाने बालकलाकार म्हणून भूमिका केली होती. त्यानंतर ‘मे आय कम इन मॅडम?’ या विनोदी मालिकेतील तिची भूमिकाही गाजली होती. फॅमिली टाईम विथ कपिलमध्येही नेहा दिसली होती. प्यार कोई खेल नही, देवदास, दिल तो बच्चा है जी अशा बॉलिवूडपटांमध्येही ती झळकली होती.

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...