नेटफ्लिक्सच्या मेंबरशिपबाबत तुम्हालाही मेल आलाय? ऑनलाईन फसवणुकीपासून सावधान!
नुकतंच ऑनलाईन माध्यमांद्वारे एक नवीन नेटफ्लिक्स फिशिंग घोटाळा समोर आला (Netflix Membership fraud Cyber police alert subscribers) आहे.
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईन माध्यमांद्वारे फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहे. याबाबत मुंबई पोलिसांकडे अनेक तक्रारीही दाखल झाल्या आहेत. नुकतंच ऑनलाईन माध्यमांद्वारे एक नवीन नेटफ्लिक्स फिशिंग घोटाळा समोर आला आहे. जो वापरकर्त्यांचे क्रेडिट कार्ड तपशीलसह इतर माहिती चोरत असल्याचे उघड झाले आहे. (Netflix Membership fraud Cyber police alert subscribers)
काय आहे फिशिंग फ्लो?
गेल्या काही दिवसांपासून काही वापरकर्त्यांना त्यांच्या बिलिंगच्या समस्येसंदर्भात ईमेल प्राप्त झाले आहेत. त्या ईमेलमध्ये वापरकरत्याला नेटफ्लिक्स सदस्यता 24 तासात रद्द करण्याचा दावा केला जातो. त्यानंतर अनेक जण त्यांचे बिल पेमेंट करण्यासाठी लिंकवर क्लिक करतात.
या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्या व्यक्तीला नेटफ्लिक्सच्या फेक वेबसाईटवर नेले जाते. वापरकर्त्यांना त्यांचे नेटफ्लिक्स लॉगिन प्रमाणपत्रे, बिलिंग पत्ता आणि क्रेडिट कार्ड तपशील करण्यास सांगितले जाते. एकदा पूर्ण माहिती त्यात टाकल्यानंतर वापरकर्त्याला नेटफ्लिक्सच्या ओरिजिनल वेबसाईटवर नेले जाते.
याप्रकारे फिशिंगचा प्रवाह पूर्ण होतो. अशाप्रकारे वापरकर्त्यांच्या नकळत त्यांच्या कार्डची माहिती घेतली जाते. त्यामुळे अनेक ग्राहक या घोटाळ्याला बळी पडतात.
विशेष म्हणजे (netfiix@csupport.co) या द्वारे ग्राहकांना ईमेल केला जातो. त्यामुळे अनेक नेटफ्लिक्स ग्राहकांना हा ओरिजनल वाटतो. त्यामुळे अनेक नेटफ्लिक्स ग्राहक फिशिंग घोटाळ्याला बळी पडतात.
नेटफ्लिक्स ग्राहकांनी हे लक्षात ठेवा
- फिशर्सना ओरिजिनल कंपनीचा लोगो वापरकर्त्याना फसवण्यासाठी कशा प्रकारे वापरायचं हे चांगल्या प्रकारे माहिती आहे म्हणून आपण क्लिक करण्यापूर्वी विचार करावा.
- ईमेल आणि त्याचा ईमेल आयडी काळजीपूर्वक तपासा.
- सगळ्याच वेबसाईट ओरिजिनल नसतात त्यामुळे सगळ्याच वेबसाईट वर विश्वास ठेवू नये.
- कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका किंवा संशयास्पद ईमेलमधील अट्याचमेंट डाउनलोड करू नका.
- आपली वैयक्तिक महिती किंवा बँक, के्डिट/डेबिट कार्ड आणि ओटीपी इ. तपशील कोणाशीही शेअर करु नका.
- अशा प्रकारच्या सापळ्यात अडकण्यापूर्वी ओरिजिनल नेटफ्लिक्स वेबसाइट वर जा आणि आपले बिल पेमेन्ट इत्यादी तपशील पडताळून बघा. (Netflix Membership fraud Cyber police alert subscribers)
संबंधित बातम्या :
लॉकडाऊनमध्ये कामधंदा नाही, आर्थिक अडचणीतून वाद, जन्मदात्या बापाकडून मुलाची हत्या