महिलेचा चालू कारमध्ये बाळाला जन्म, व्हिडीओ व्हायरल

न्यूयॉर्क : अमेरिकेतील निवाडामध्ये एका महिलेने चालू कारमध्ये बाळाला जन्म दिलाय. रुडी नेपियर नावाची महिला तीन मुलं आणि पतीसोबत रुग्णालयात जात होती. रस्त्यातच प्रसूती वेदना सुरु झाल्या. यानंतर चालू कारमध्येच महिलेने बाळाला जन्म दिला. या घटनेचा व्हिडीओही या दाम्पत्याकडून शेअर करण्यात आलाय. जगभरात या व्हिडीओची चर्चा आहे. प्रसूतीवेळी पती माईक एंटनी हे कार चालवत होते. […]

महिलेचा चालू कारमध्ये बाळाला जन्म, व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: May 29, 2019 | 7:57 PM

न्यूयॉर्क : अमेरिकेतील निवाडामध्ये एका महिलेने चालू कारमध्ये बाळाला जन्म दिलाय. रुडी नेपियर नावाची महिला तीन मुलं आणि पतीसोबत रुग्णालयात जात होती. रस्त्यातच प्रसूती वेदना सुरु झाल्या. यानंतर चालू कारमध्येच महिलेने बाळाला जन्म दिला. या घटनेचा व्हिडीओही या दाम्पत्याकडून शेअर करण्यात आलाय. जगभरात या व्हिडीओची चर्चा आहे. प्रसूतीवेळी पती माईक एंटनी हे कार चालवत होते.

रुडी नेपियर या कारमध्ये पुढच्या सीटवर बसलेल्या होत्या. रुग्णालयात जातानाच त्यांना प्रसूती वेदना सुरु झाल्या. मागच्या सीटवर असलेल्या रुडी यांच्या 10 वर्षांच्या मुलाने हा संपूर्ण व्हिडीओ शूट केलाय. काही वेळाने मोबाईलमध्ये हा व्हिडीओ मिळाल्यानंतर वडील माईक यांनी फेसबुकवर व्हिडीओ शेअर केला. लाखो लोकांनी हा व्हिडीओ शेअर केलाय.

रुडी यांनी स्वतः या घटनेबाबत अत्यंत आनंदाने माहिती दिली. आयुष्यात आजपर्यंत असं होताना कधीही पाहिलं नव्हतं. मी अत्यंत वेगळ्या पद्धतीने मुलाला जन्म दिलाय, असं रुडी यांनी फॉक्स 5 शी बोलताना सांगितलं. या पद्धतीने व्हिडीओ समोर आल्यामुळे या मुलाचीही जगभर चर्चा आहे. या कुटुंबाने फेसबुकच्या माध्यमातून आता निधी जमा करणं सुरु केलंय, जेणेकरुन सर्व कुटुंबासाठी एक गाडी घेता येईल.

माईक यांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ‘BEAUTIFUL nightmare!!’ असं कॅप्शन दिलं. व्हिडीओ शेअर केल्यानंतर माईक यांना हजारो नोटिफिकेशन येत आहेत. पत्नी आणि मुलाच्या देखभालीबाबत त्यांनी रुग्णालयाचेही आभार मानले आहेत. मुलगा आणि आई दोघांचीही प्रकृती अत्यंत चांगली असल्याचं त्यांनी सांगितलंय.

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.