कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन, केंद्र सरकार नरमले; 3 डिसेंबरला चर्चेची तयारी

मी शेतकरी बांधवांना आवाहन करतो की त्यांनी आंदोलन करु नये. आम्ही या समस्येवर चर्चा करुन मार्ग काढण्यास तयार आहोत. | New farm laws

कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन, केंद्र सरकार नरमले; 3 डिसेंबरला चर्चेची तयारी
Follow us
| Updated on: Nov 26, 2020 | 3:37 PM

नवी दिल्ली: कृषी कायद्यांविरोधात (Farm laws) पंजाब आणि हरियाणातील छेडलेल्या उग्र आंदोलनानंतर आता केंद्र सरकार पहिल्यांदाच नरमले आहे. केंद्र सरकारने आता शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. 3 डिसेंबरला आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा करु, अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar)  यांनी दिली. (New farm laws Central govt ready to talk with farmers)

नवे कृषी कायदे ही काळाची गरज आहे. आगामी काळात त्यामुळे क्रांतिकारी बदल पाहायला मिळतील. या कायद्यांविषयी असणारे शेतकऱ्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही पंजाबमध्ये सचिव स्तरावर चर्चाही केली आहे. त्यामुळे मी शेतकरी बांधवांना आवाहन करतो की त्यांनी आंदोलन करु नये. आम्ही या समस्येवर चर्चा करुन मार्ग काढण्यास तयार आहोत. या चर्चेतून काहीतरी सकारात्मक तोडगा निघेल, असे नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले.

यापूर्वीही नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांना दिल्लीत चर्चा करण्यासाठी बोलवले होते. त्यावेळी केवळ कृषी कायद्यांना पाठिंबा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाचीच कृषीमंत्र्यांनी भेट घेतली. तर या कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेटणे कृषीमंत्र्यांनी टाळले होते. या बैठकीला केवळ सचिव स्तरावरील अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे बराच गदारोळही निर्माण झाला होता.

मोदी सरकारने सप्टेंबर महिन्यात पावसाळी अधिवेशानवेळी संसदेत कृषी विधेयके मंजूर करवून घेतली होती. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी या विधेयकांना कडाडून विरोध केला होता. मात्र, भाजपने प्रादेशिक पक्ष आणि अपक्षांची मदत घेत विधेयके मंजूर करवून घेण्यात यश मिळवले होते. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकांचे कायद्यात रुपांतर झाले होते.

मात्र, यानंतर अनेक बिगरभाजप राज्यांनी कृषी कायद्यांविरोधात ठाम भूमिका घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत हे कायदे राज्यांमध्ये लागू होऊ देणार नाही, या पवित्र्यात ही राज्ये आहेत. याचे सर्वाधिक पडसाद पंजाब आणि हरियाणात उमटत आहेत. पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी चलो दिल्ली आंदोलन सुरु केले असून मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीकडे निघाले आहेत. शेतकऱ्यांचा विरोध पाहता हरियाणा सीमा सील करण्यात आली आहे. 26 आणि 27 नोव्हेंबरला सीमा बंद राहणार आहेत.

संबंधित बातम्या:

Farmers Protest Live Update | कृषी कायद्यांविरोधात पंजाब हरियाणातील शेतकरी आक्रमक, दिल्ली चलो आंदोलन सुरु

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबमधील शेतकरी आंदोलनं सुरुच, 41 रेल्वेगाड्या रद्द

शेतकऱ्यांचा आसूड कडाडला! बॅरिकेडिंग फेकल्या, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या; हरयाणा बॉर्डवर पोलीस-शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री

(New farm laws Central govt ready to talk with farmers)

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.