Pune Lockdown | पुणेकरांचा लॉकडाऊन संपला, पूर्वीच्या निर्बंधांसह नवे नियम जाहीर

13 जुलैच्या अगोदर शासनाने आणि महानगरपालिकेने जाहीर केलेली नियमावलीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय विशेष अधिकारी सौरभ राव यांनी दिली.

Pune Lockdown | पुणेकरांचा लॉकडाऊन संपला, पूर्वीच्या निर्बंधांसह नवे नियम जाहीर
Follow us
| Updated on: Jul 23, 2020 | 11:47 PM

पुणे : पुण्यातील दुसऱ्या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस आहे. पुणे शहरात शुक्रवारपासून लॉकडाऊन नसेल. मात्र, 13 जुलैच्या अगोदर शासनाने आणि महानगरपालिकेने जाहीर केलेली नियमावलीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय विशेष अधिकारी सौरभ राव यांनी दिली (New Guidelines Announced For Pune After Lockdown Over).

ऑनलाईन आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हापरिषदेचे सीईओ आयुष प्रसाद, पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर आदी उपस्थित होते. यावेळी राव म्हणाले की, लॉकडाऊन उठवताना 13 जुलैच्या अगोदरचे निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहेत.

विशेष म्हणजे शनिवार आणि रविवार किंवा मंगळवार आणि बुधवार या दोन दिवशी इथून पुढे लॉकडाऊनचा आमचा विचार असल्याचंही सौरभ राव यांनी सांगितले. “पुण्यातील दहा दिवसांच्या लॉकडाऊनचे फायदे येत्या काही दिवसांमध्ये दिसतील. रुग्णांची साखळी तुटल्याने रुग्णसंख्या काही दिवसांनी कमी येईल. दोन दिवस बंद ठेवण्याचा प्रस्ताव व्यापार्‍यांनी दिलेला आहे. त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे”, असंही त्यांनी सांगितलं.

87 प्रतिबंध क्षेत्र जाहीर

यानुसार, प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर नियम आणि अटीनुसार परवानगी देण्यात आली आहे. मात्र, विकेंडला शनिवारी आणि रविवारी मार्केटला खरेदीसाठी गर्दी होते. त्याचबरोबर लग्नसमारंभात गर्दी होत आहे. त्यामुळे लॉकडाऊन उठला असला तरी गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंध घालण्याचा प्रशासनाचा विचार आहे. यासंदर्भात मनपा आयुक्तांनी नियमावली प्रसिद्ध केली. या नियमावलीनुसार, नागरिकांना व्यवसायिकांना परवानगी देण्यात आली. लग्न सोहळा आणि अंत्यसंस्कारासाठी जास्तीत जास्त वीस जणांना परवानगी मात्र सुरक्षित अंतर ठेवण्याचे बंधन कायम आहे. नव्या नियमावलीनुसार, 87 प्रतिबंध क्षेत्र जाहीर करण्यात आले आहेत.

31 जुलैपर्यंत निर्बंध राहणार

31 जुलैपर्यंत केंद्र सरकारने घालून दिलेले लॉकडाऊनचे नियम पाळण्यात येणार आहे. 13 जुलैपूर्वी पुणे महानगरपालिकेने लॉकडाऊनच्या निर्बंध संदर्भात एक नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे. हीच नियमावली पुढेही लागू राहील.

प्रतिबंधित क्षेत्राच्या आत

– वैद्यकीय आपत्कालीन सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा, पाणी पुरवठा सुरळीत राहण्यासाठी या सेवा वगळण्यात आल्या. याव्यतिरिक्त अन्य व्यक्तींना संबंधित प्रतिबंधित क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यास आणि परिसरातून बाहेर पडण्यास बंदी

– प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये दूध आणि भाजीपाला तसेच इतर अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा गॅस जीवनावश्यक, औषध विक्री यांच्या वाहनांना सवलत

– प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा किराणा, भाजीपाला, औषध विक्री, रुग्णालय, दूध विक्री, रेशन 9 ते दुपारी 2 या वेळेत सुरु राहील

प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर

– सायकलिंग, जॉगिंग, धावणे मोकळ्या मैदानावर पालिकेच्या मैदान सोसायटी मैदान इथं अटींच्या अधीन राहून करता येईल, मात्र कोणतीही क्रिया क्रीडांगणाच्या बंदिस्त भागात केली जाणार नाही.

– मॉल आणि व्यापारी संकुल वगळता सर्व व्यापारी क्षेत्रे रस्त्यावरील दुकानं सुरु होतील. सम-विषम या सूत्रानुसार मुख्य रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सम तारखेला आणि दुसऱ्या बाजूची दुकाने विषमता तारखेला सुरु राहतील

– मंडई मधील सम क्रमांकांचे गाळे सम तारखेला, विषम क्रमाकांचे गाळे विषम तारखेला सुरु राहतील. हे सर्व सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत नियमानुसार सुरु राहील

दुकानांसाठी नियमावली

– दुकानांमध्ये ट्रायल रुमचा वापर करता येणार नाही. त्याचबरोबर विक्री केलेले कपडे बदलून अथवा परत मिळणार नाही

– दुकानांमध्ये वस्तू खरेदीसाठी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सहा फुटाच्या अंतरावर खुणा कराव्यात

– नागरिकांनी खरेदीसाठी शक्‍यतो जवळच्या दुकानात जावे

वाहनांसाठी नियमावली

– टॅक्सी किंवा कॅब त्यामध्ये अत्यावश्यक सेवेसाठी वाहनचालक आणि इतर दोघेजण

– रिक्षा अत्यावश्यक वाहनं, चालक आणि इतर दोघेजण

– चार चाकी मालकीचे वाहन अत्यावश्यक सेवेसाठी वाहन चालक आणि इतर दोन

– दुचाकीवर केवळ एकच व्यक्ती

New Guidelines Announced For Pune After Lockdown Over

प्रतिबंधित क्षेत्राबाहेर

– दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहतील

– कर्मचारी हे प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील असावे

– दुकानांमध्ये सोशल डिस्टन्स पाळला जावं, मास्क आवश्यक, सॅनिटायझरचा वापर केला जावा

– सर्व खाजगी कार्यालयं त्यांच्या कर्मचारी संख्येच्या दहा टक्के किंवा जास्तीत जास्त दहा कर्मचारी ठेवावेत. उर्वरित कर्मचाऱ्यांनी वर फ्रॉम होम करावा

– शाळा, महाविद्यालयं, शिकवण्या बंद राहतील

– सिनेमा हॉल, व्यायामशाळा, पोहण्याचे तलाव, करमणुकीचे केंद्र नाट्यगृह बंद राहील

– राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना प्रतिबंध, धार्मिक स्थळे स्पा मॉल-हॉटेल बंद राहणार

– लग्नसमारंभाला जास्तीत जास्त 20 जण एकत्र येऊ शकतात, मात्र सोशल डिस्टन्स पाळणं आवश्यक

– अंत्यसंस्काराला जास्तीत जास्त 20 व्यक्ती एकत्र येऊ शकतात. मात्र, सुरक्षित अंतर ठेवावे लागेल

– सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई, सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, मद्य सेवन करता येणार नाही

– मद्याच्या विक्रीत दुकानात दोन व्यक्तींमधील अंतर सहा फूट राहील. एकावेळी पाच व्यक्ती हजर राहू शकतील

अत्यावश्यक सेवा

– मेडिकल, हॉस्पिटल वैद्यकीय सेवा आणि उत्पादनं सुरु राहील

– शेतमालाचे निगडित उत्पादन सुरु राहील

– घरकाम करणाऱ्या व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर घर काम करण्यास मनाई

– प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या घरी घर मालकाची इच्छा असल्यास स्वच्छेने काम करता येईल

– वर्तमान पत्राचे वितरण करता येईल

– वित्तीय बँक कमीत-कमी कर्मचाऱ्यांमध्ये सुरु ठेवाव्यात, एटीएम, विमा कंपन्या सुरु राहील

– माहिती तंत्रज्ञान कंपन्या 50 टक्के कर्मचाऱ्यांवर सुरु करता येईल, इतर कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम करावे

– कामाच्या ठिकाणी मजुरांची व्यवस्था होत असेल त्या बांधकामाला परवानगी

– पथारी व्यवसायिक सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत सुरु ठेवू शकतात, दोघांमध्ये 5 मीटर अंतर ठेवावे

New Guidelines Announced For Pune After Lockdown Over

संबंधित बातम्या :

Pune Lockdown | लॉकडाऊन संपल्यावर राज्य सरकारचे निर्देश 31 जुलैपर्यंत कायम : पुणे जिल्हाधिकारी

Pune Lockdown | लॉकडाऊनमध्ये मास्क न वापरणाऱ्या 6 हजार 799 बेफिकीर पुणेकरांवर कारवाई

'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.