मुंबई : हिंदू सेना आणि करणी सेनेच्या विरोधानंतर अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar)आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या चित्रपटाचे नाव लक्ष्मी बॉम्ब बदलून लक्ष्मी(Laxmii) ठेवण्यात आले आहे. त्यानंतर आता चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रसिद्ध झाले आहे. चित्रपटाचे नवीन पोस्टर अक्षय कुमारने त्याच्या ट्विटरवर शेअर केले आहे. पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, प्रत्येक घरात ‘लक्ष्मी’ येणार 9 नोव्हेंबरला कुटुंबासमवेत तयार राहा. या पोस्टरमध्ये कियारा अडवाणी समोर दिसत आहे, तर अक्षय कुमार तिच्या मागे लक्ष्मीच्या रूपात दिसत आहे. कपाळावर मोठे कुंकू आणि डोळ्यात सूडाची आग दिसत आहे.(New poster of Akshay Kumar’s movie Laxmii)
Ab harr ghar mein aayegi #Laxmii! Ghar waalon ke saath taiyaar rehna 9th November ko!?#FoxStarStudios #DisneyPlusHotstarMultiplex #YehDiwaliLaxmiiWali@advani_kiara @offl_Lawrence @Shabinaa_Ent @tusshkapoor @foxstarhindi @DisneyplusHSVIP #CapeOfGoodFilms #ShabinaaEntertainment pic.twitter.com/16uupJuC7P
— Akshay Kumar (@akshaykumar) October 31, 2020
अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला होता. बर्याच लोकांनी या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी केली होती आणि सोशल मीडियावरही बहिष्काराची मागणी केली जात होती. करणी सेनेने अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचे नाव बदलण्यासाठी नोटीस पाठविली होती. ही नोटीस चित्रपटाच्या निर्मात्यांना पाठविली गेली होती.
चित्रपटाच्या नावावरून वाढणारा वाद पाहून चित्रपटाचे दिग्दर्शक राघव लॉरेंस आणि चित्रपट निर्मात्यांनी सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी ठेवलेल्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगनंतर सीबीएफसीशी चर्चा करून, आपल्या प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेऊन, चित्रपटाचे निर्माते शबीना खान, तुषार कपूर आणि अक्षय कुमार यांनी चित्रपटाचे नाव बदलण्याचा निर्णय अखेर घेतला. हा चित्रपट 9 नोव्हेंबर रोजी डिज्नी हॉटस्टार रिलीज होणार आहे. चित्रपट यापूर्वी 22 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोनामुळे रिलीजची तारीख बदलण्यात आली होती.
‘हे’ होते वादाचे मुख्य कारण
एका विशिष्ठ समुदायाला भडकवण्यासाठी निर्मात्यांनी या चित्रपटाचे नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ असे ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. प्रेक्षकांच्या मते, लक्ष्मी या नावासमोर बॉम्ब हा शब्द वापरणे अमान्य आहे. आपण ज्या लक्ष्मीची पूजा करतो, तिचा सन्मान करतो, तिच्या नावापुढे बॉम्ब असा शब्द लिहिणे अतिशय निंदनीय आहे. अक्षयचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचे देखील हिंदू सेनेने म्हटले होते. या चित्रपटात एक हिंदू मुलगी आणि मुस्लिम तरुणाची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. याच मुद्द्याला धरून, हिंदू सेनेने प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाचे नाव नाव बदलण्याची मागणी केली होती.
संबंधित बातम्या :
Laxmii | खिलाडी कुमारला ‘बॉयकॉट’चा धसका, अखेर ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचे नाव बदलले!
Laxmmi Bomb | ‘लक्ष्मी बॉम्ब’ पुन्हा वादात, चित्रपटाचे नाव बदलण्याच्या मागणीला जोर!
Laxmmi Bomb | ‘लक्ष्मी बॉम्ब’वर आता ‘शक्तिमान’ही नाराज, मुकेश खन्नांकडून मेकर्सवर हल्लाबोल!
(New poster of Akshay Kumar’s movie Laxmii)