Marathi News Latest news New rules for bottled water mineral water that require adding minerals to finally take effect from january 1
1 जानेवारीपासून ‘मिनरल वॉटर’ची चव बदलणार, जाणून घ्या कारण
1 जानेवारी 2021 पासून बाटलीबंद पाण्यासाठी ‘एफएसएसआय’कडून (FSSAI) नवे नियम घालून देण्यात आले आहेत. | New Rules For Bottled Water
Follow us
1 जानेवारी 2021 पासून बाटलीबंद पाण्यासाठी ‘एफएसएसआय’कडून (FSSAI) नवे नियम घालून देण्यात आले आहेत.
त्यानुसार आता एक लीटर बाटलीबंद पाण्यात (Mineral water) 20 मिलीग्रॅम कॅल्शियम आणि 10 मिलिग्रॅम मॅग्नेशियम हे घटक मिसळणे बंधनकारक करण्यात आले आहे.
बिसलरी, कोका-कोला, पेप्सी यासारख्या बड्या कंपन्यांनी या नियमांचे पालन करण्याची तयारी दाखविली आहे.
मात्र, बाटलीबंद पाणी विकणाऱ्या लहान कंपन्यांकडून या नियमाचे पालन होणार का, याबाबत अद्याप साशंकता आहे.
मिनरल्स (Minerals) हे पाण्याच्या चवीसाठी चांगले मानले जातात. त्यामुळेच राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) बाटलीबंद पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा समावेश करण्याचे आदेश दिले होते.
राष्ट्रीय हरित लवादाने 29 मे 2019 रोजी याबाबत आदेश काढला होता. मात्र, संबंधित कंपन्यांनी मुदतवाढ मागितली होती. मात्र, आता कोणत्याही परिस्थितीत हा नियम लागू करण्याचे आदेश FSSAI ने दिले आहेत.
भारतात बाटलीबंद पाण्याच्या उद्योगाची उलाढाल जवळपास 3000 कोटी रुपये इतकी आहे. बाजारपेठेत बहुतांश करुन 1 लीटरच्या पाण्याच्या बाटल्या विकल्या जातात. हे प्रमाण जवळपास 42 टक्के इतके आहे.