‘गमावलेले पैसे आणि प्रसिद्धी परत येते, पण…’, बॉलिवूड गँगच्या वक्तव्यानंतर ए. आर. रहमानचं नवं ट्विट

ए. आर. रहमानने आपल्या नव्या ट्विटमध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या एका ट्विटला रिट्विट करत मत व्यक्त केलं (A R Rahman on Shekhar Kapoor bollywood gang ).

'गमावलेले पैसे आणि प्रसिद्धी परत येते, पण...', बॉलिवूड गँगच्या वक्तव्यानंतर ए. आर. रहमानचं नवं ट्विट
Follow us
| Updated on: Jul 27, 2020 | 3:32 PM

मुंबई : बॉलिवूडमधील घराणेशाहीवरील वादानंतर अनेक स्टार आपआपले अनुभव शेअर करत प्रतिक्रिया देत आहेत (A R Rahman on Shekhar Kapoor bollywood gang ). तसेच बॉलिवूडमधील स्वार्थी वातावरणावर प्रश्न उपस्थित करत आहेत. नुकतीच बॉलिवूडसह आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेला प्रसिद्ध संगितकार, गायक ए. आर. रहमानने देखील आपले असेच अनुभव शेअर केले. बॉलिवूडमध्ये एक टोळी माझं नुकसान व्हावं म्हणून काम करत आहे, असं मत रहमानने व्यक्त केलं. यानंतर या वादाला चांगलीच फोडणी मिळाली. आता पुन्हा एकदा रहमानने एक नवं ट्विट केलं आहे.

ए. आर. रहमानने आपल्या नव्या ट्विटमध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या एका ट्विटला रिट्विट करत मत व्यक्त केलं (A R Rahman on Shekhar Kapoor bollywood gang ). यात रेहमान म्हणाला, “गमावलेले पैसे परत येतात. गमावलेली प्रसिद्धी देखील परत येते, मात्र आयुष्यात महत्त्वाचा वेळ कधीच परत येत नाही. शांती. चला आता पुढे जाऊयात. आपल्याकडे अधिक चांगलं करण्यासाठी खूप गोष्टी आहेत.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दरम्यान, दिग्दर्शक शेखर कपूर यांनी ए. आर. रहमानच्या बॉलिवूड गँगच्या वक्तव्याच्या बातमीच्या फोटोसह एक ट्विट केलं होतं. यात त्यांनी ए. आर. रहमानला टॅग करत म्हटलं होतं, “तुझी अडचण काय आहे हे तुला माहिती आहे का? तु अगदी ऑस्कर पुरस्कार जिंकून आला आहेस. इकडं बॉलिवूडमध्ये ऑस्कर म्हणजे मृत्यूचं चुंबन (‘किस ऑफ डेथ’) आहे. बॉलिवूडमध्ये ऑस्कर मिळवण्यात अनेकदा अपयश आलं आहे. या पुरस्काराने तुझं कर्तूत्व सिद्ध केलं आहे. हे कर्तूत्व बॉलिवूडला सांभाळता येईना.”

ए. आर. रहमानने शेखर गुप्ता यांच्या ट्विटवर व्यक्त केलेल्या मतातून त्यांना हा वाद वाढवायचा नसल्याचं दिसत आहे. त्यामुळेत ते आपल्याल ट्विटमध्ये जे झालं ते परत येणार नाही असं म्हणताना आता पुढे जाण्याचं आवाहन केलं आहे. तसेच अधिक चांगलं करण्यासारखं आपल्याकडे खूप आहे ते करुयात असंही रहमानने म्हटलं आहे. दरम्यान, बॉलिवूडमधील घराणेशाहीवरुन अनेक अभिनेते इतर काही अभिनेत्यांवर टीका करत आहेत.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. अभिनेत्री कंगणा रनौतने सुशांतची आत्महत्या हा एक नियोजित हत्येचा कट आहे, असा आरोप केलाय. तसेच बॉलिवूडमधील काही अभिनेते आण दिग्दर्शकांवर आरोप केला आहे. दुसरीकडे अनेक स्टार प्रत्येक क्षेत्रात घराणेशाही असल्याचं सांगत आहेत. तसेच हुशार लोकांना बॉलिवूडमध्ये आपली जागा तयार करता येतेच, असं म्हणत आहेत.

हेही वाचा :

Sushant Singh Rajput Suicide | करण जोहरला चौकशीसाठी बोलवलं जाणार : गृहमंत्री

घराणेशाहीला ‘चेकमेट’ करण्यासाठी ‘क्वीन’ मैदानात, सुशांत आत्महत्या प्रकरणी जबाब देण्यासाठी कंगनाचे पोलिसांना पत्र

Kangana Ranaut | लॉकडाऊनमुळे कंगना मनालीला अडकली, मुंबई पोलिसांनी पोस्टाने समन्स पाठवला

A R Rahman on Shekhar Kapoor bollywood gang

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.