कडाक्याच्या थंडीत दोन दिवसांच्या बाळाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं, पादचाऱ्यामुळे अर्भकाला जीवदान
कडाक्याच्या थंडीत मिरजेत दोन दिवसांच्या नवजात स्त्री जातीच्या बाळाला रस्त्याच्या कडेला टाकल्याची धक्कादायक घटना समोर (Newborn girl child throw in Garbage) आली आहे.
सांगली : कडाक्याच्या थंडीत मिरजेत दोन दिवसांच्या नवजात स्त्री जातीच्या बाळाला रस्त्याच्या कडेला टाकल्याची धक्कादायक घटना समोर (Newborn girl child throw in Garbage) आली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या अज्ञाताने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात या लहान मुलीला टाकले होते. शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे या लहान मुलीचा जीव वाचवण्यात यश आलं आहे. सध्या मिरज पोलीस या घटनेची चौकशी करत आहे.
मिरज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (19 फेब्रुवारी) रात्री 9.30 च्या सुमारास मिरजेतील कुपवाड रोडवरील निपाणीकर कॉलनी शेजारच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका लहान बाळाचा रडण्याचा आवाज येत होता. या लहान बाळाला कापडात गुंडाळून एका प्लास्टिकच्या पिशवीत घालून रस्त्याच्या कडेला टाकून दिलं होतं.
त्यावेळी ऋषिकेश मेहंद्रकर हे घरी जात असताना त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यानंतर त्यांनी प्रसंगावधान राखत मिरज पोलिसांनी या घटनेची माहिती (Newborn girl child throw in Garbage) दिली.
या घटनेची माहिती मिळताच मिरज पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या बाळाला पिशवीतून बाहेर काढले. त्यानंतर उपचारासाठी मिरजच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात दाखल केले.
दरम्यान सध्या या मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर अशाप्रकारे नवजात मुलीला रस्त्यावर टाकून जाणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलीस शोध घेत (Newborn girl child throw in Garbage) आहेत.