इंजिनिअर नवविवाहितेवर सावकाराचा बलात्कार, सिगारेटचे चटके

कोल्हापूर : पुरोगामी म्हणवणाऱ्या कोल्हापुरात सावकाराच्या निर्दयीपणाचा कळस पाहायला मिळत आहे. पैशाच्या वसुलीसाठी सावकाराने इंजिनिअर असलेल्या नवविवाहितेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक आरोप आहे. इतकंच नाही तर मारहाण करुन; सिगारेटचे चटके देऊन ब्लॅकमेलही केल्याचा आरोप आहे. धमकी देत सावकाराने या नवविवाहितेवर बलात्कार केल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रकरणी कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिस स्टेशनमध्ये सावकारासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात […]

इंजिनिअर नवविवाहितेवर सावकाराचा बलात्कार, सिगारेटचे चटके
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

कोल्हापूर : पुरोगामी म्हणवणाऱ्या कोल्हापुरात सावकाराच्या निर्दयीपणाचा कळस पाहायला मिळत आहे. पैशाच्या वसुलीसाठी सावकाराने इंजिनिअर असलेल्या नवविवाहितेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक आरोप आहे. इतकंच नाही तर मारहाण करुन; सिगारेटचे चटके देऊन ब्लॅकमेलही केल्याचा आरोप आहे. धमकी देत सावकाराने या नवविवाहितेवर बलात्कार केल्याचं सांगण्यात येत आहे.

याप्रकरणी कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिस स्टेशनमध्ये सावकारासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या सावकारासह सावकाराला मदत करणाऱ्या अन्य साथीदारांचा शोध घेत आहेत.

धक्कादायक म्हणजे नवविवाहित ही इंजिनिअर आहे. तिच्यासोबत असं कृत्य घडल्याने या सावकाराने कोणत्या प्रकारचे ब्लॅकमेलिंग केलं असावं याचा केवळ अंदाज बांधता येऊ शकतो. आता पोलिस आरोपींच्या मुसक्या कधी आवळणार याकडे पीडितांचं लक्ष लागलं आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

तक्रारदार महिलेचा वर्षभरापूर्वी प्रेमविवाह झाला होता. मूळचे पुण्याचे असलेले हे दाम्पत्य कोल्हापुरातील रुईकर कॉलनीत राहण्यास आले होते. त्यावेळी कौटुंबीक खर्चासाठी पतीने आर्थिक उसनवारी केली होती. सावकाराकडून त्यांनी 30 हजार रुपये घेतले होते. मात्र कर्जाच्या बदल्यात सावकाराने नवविवाहितेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

कर्जाची परतफेडीऐवजी शरीरसुखाची मागणी करत, सावकाराने महिलेवर दारु पिऊन बलात्कार केल्याचा आरोप आहे. शिवाय घटनेची वाच्यता केल्यास बरंवाईट करण्याची धमकी दिल्याचं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.