'नागिन' फेम निया शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सणांच्या काळात ती नेहमी पारंपरिक वेशातील आपले फोटो शेअर करत असते.
अलिकडेच दिवाळीनिमित्त निया शर्माने पांढरा सूट परिधान केला होता. त्यासह तिने रंगीबेरंगी स्कार्फ घेतला होता.
निया शर्मा बर्याचदा बोल्ड अवतारात दिसते. यामुळे बर्याच वेळा नियाला ट्रोलही केले गेले आहे.
मात्र, यावेळी निया शर्माचा हा ‘देसी अवतार’ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.
‘देसी गर्ल’ म्हणत चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. नियाचा हा सिंपल लूक सध्या चर्चेत आहे.
नियाच्या लूकची तुलना 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' चित्रपटातील आलिया भट्टच्या लूकशी केली जात आहे.