नंदुरबारमधील निगदी गावानं करुन दाखवलं, सातपुडा डोंगररांगेत 50 हेक्टरवर वृक्षलागवड, इतर गावांनी घेतला आदर्श
नंदुरबार जिल्ह्यातील निगदी या गावाने निसर्ग संपदा संवर्धनाचा अनोखा उपक्रम राबवला आहे. ( Nigadi Tree Planting )

नंदुरबार: जिल्ह्यातील निगदी या गावाने निसर्ग संपदा संवर्धनाचा अनोखा उपक्रम राबवला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे सातपुड्याच्या डोंगर रांगा हिरव्यागार होऊ लागल्या आहेत. निगदीचा हा आदर्श उपक्रम लक्षात घेऊन अन्य गावंही आता सातपुडा हिरवागार करण्याच्या मोहिमेत हातभार लावत आहे. सातपुड्यातल्या आदिवासी समाजाचा विकास करून त्याला रोजगाराच्या संधी देऊन स्थलांतरण थांबवायचे असेल तर या भागातील जंगल वाढवून ते सुरक्षित करणे गरजेचे आहे. हा वन वृद्धीचा मूलमंत्र या भागातील गणेश पराडगे यांनी अमलात आणण्याचा प्रयत्न सुरु केला. (Nigadi villagers of Nandurbar started tree planting and nature conservation project)
गणेश पराडगे यांनी निगदी गावातील तरुणांना त्यांनी सोबत घेतले आणि सामूहिक वन अधिकारात मिळालेल्या जमिनीवर वृक्ष लागवड केली. यानंतर १५ सदस्यांची सामूहिक वन व्यस्थापन समिती स्थापन केली गेली. यामध्ये पाच महिलांना समाविष्ट केले गेले. वन विभागाचे सहाय्य आणि रोजगार हमी योजनेतून रोजंदारीवर वृक्ष लागवड करण्यात आली. या प्रयत्नांमुळे गावाच्या वाट्याला आलेल्या ७०० हेक्टर सामुदायिक वनाधिकारात मिळालेल्या वन जमिनी पैकी ५० हेक्टर पर्यंत जमिनीवर विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. सुरुवातीची पाच वर्ष या तरुणांना श्रम घ्यायचे आहेत, त्यासाठी आवश्यक मानसिकता तयार झाल्याचे गणेश पराडगे सांगतात. (Nigadi villagers of Nandurbar started tree planting and nature conservation project)
डोंगरावर कुऱ्हाड आणि चराई बंदी
गावातील तरुणांनी भर उन्हात डोक्यावर हंडा भरून झाडांना पाणी दिले. गेल्या दोन वर्षांपासून या डोंगरांवर कुऱ्हाड आणि चराई बंदी आहे. आगामी काळात या गावाला वनसंपदेच्या माध्यमातून बांबू आणि अन्य फळं विक्रीतून काही लाखांच्या घरात उत्पन्न मिळणार आहे. या जंगल विस्तारामुळे स्थानिक ठिकाणीच रोजगार मिळेल, असं मुकेश वळवी या वृक्ष संवर्धन करणाऱ्या तरुणानं सांगितले.
निगदी गाव परिसरातील डोंगरांवर दिसणारी हिरवळ अन्य गावांनाही भुरळ घालत आहे. अवघ्या दोन वर्षात ६ गावांनी आपल्या सामूहिक वनक्षेत्रावर वृक्ष लागवड सुरु केली आहे. या भागात तग धरून उत्पन्न देतील अशी बांबू, निंब, आंबा, महू अशा झाडांची लागवड केली जात असल्याची माहिती नारायण पावरा यांनी दिली. (Nigadi villagers of Nandurbar started tree planting and nature conservation project)
निगदी परिसरातील सहा गावातील एकूण ७८ हेक्टर सामूहिक वनक्षेत्रावर गेल्या दोन वर्षात वृक्ष लागवड झाली असून या माध्यमातून ५८ हजार ४०० रोपांची लागवड झाली आहे. बांबू लागवडीतून तर येणाऱ्या दोन वर्षात उत्पन्नही सुरु होईल.
साताऱ्यातील मायणी पक्षी अभयारण्याचा राखीव वनक्षेत्रात समावेशhttps://t.co/WyVAI0a80e #Satara #Forest
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 7, 2020
संबंधित बातम्या :
Nandurbar | नोकरी सोडून शेतीची कास, नंदुरबारच्या उच्च शिक्षित तरुणाचं आळंबी उत्पादनात घवघवीत यश
(Nigadi villagers of Nandurbar started tree planting and nature conservation project)