चीनचं जाऊ द्या, आधी मुख्यमंत्र्यांना मातोश्रीबाहेर काढून दाखवा : निलेश राणे

'चीनचं जाऊ द्या, आधी मुख्यमंत्र्यांना मातोश्रीबाहेर काढून दाखवा', असा टोला भाजप नेते निलेश राणे यांनी लगावला आहे. (Nilesh Rane Attacked on Cm Uddhav Thackeray Over Rahul gandhi Statement on China)

चीनचं जाऊ द्या, आधी मुख्यमंत्र्यांना मातोश्रीबाहेर काढून दाखवा : निलेश राणे
Follow us
| Updated on: Oct 07, 2020 | 9:19 PM

मुंबई :  चीन आपली जमीन बळकावतंय. पण आपले राज्यकर्ते कायर आहेत. काँग्रेसची सत्ता असती तर चीनला 15 मिनिटांत बाहेर काढलं असतं, असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत ‘चीनचं जाऊ द्या, आधी मुख्यमंत्र्यांना मातोश्रीबाहेर काढून दाखवा’, असा टोला भाजप नेते निलेश राणे यांनी लगावला आहे. (Nilesh Rane Attacked on Cm Uddhav Thackeray Over Rahul gandhi Statement on China)

चीनचं राहू द्या तुमची सत्ता महाराष्ट्रात आहे, आधी एक काम करा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घराच्या बाहेर काढून दाखवा , असं ट्विट करत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

“राहुल गांधींचा इतिहास कच्चा आहे, जेव्हा काँग्रेसचे ए. के. अँटनी संरक्षणमंत्री होते तेव्हा चीनने भारताच्या काही भागांमध्ये घुसखोरी केली होती. पण अँटनी यांनी हसत उत्तर दिलं, आमच्या चर्चा सुरू आहेत. चीनने घुसखोरी केलेला भाग तेव्हा भारताला मिळाला नाही. राहुल गांधी कधी हुशार होणार?”, असं ट्विट करत त्यांनी राहुल गांधीवर देखील टीकास्त्र सोडलंय.

निलेश राणे यांचं मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधणारं ट्विट

“राहुल गांधी म्हणतात आमची सत्ता असती तर १५ मिनिटात चीनला बाहेर फेकले असत. चीनचं राहू द्या तुमची सत्ता महाराष्ट्रात आहे, आधी एक काम करा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला घराच्या बाहेर काढून दाखवा”

काय म्हणाले होते राहुल गांधी

पंतप्रधान मोदी हे भित्रे आहेत. त्यांनी चीनला आपली जमीन बळकावण्याची संधी दिलीये. मात्र याच जागी काँग्रेसचं सरकार असतं तर चीनला 15 मिनिटांतच बाहेर फेकून दिले असते, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं.

(Nilesh Rane Attacked on Cm Uddhav Thackeray Over Rahul gandhi Statement on China)

संबंधित बातम्या

निलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर

‘नाणार’मध्ये मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांनाच भूखंडाचे श्रीखंड; निलेश राणेंचा दावा

लोकसभेत समर्थन, राज्यसभेत विरोध; शिवसेनेच्या ‘गोंधळा’वर निलेश राणेंचा निशाणा

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.