नवी दिल्ली : चीनविरोधातील वज्रमूठ घट्ट होत असतानाच चीनला उत्तर देण्याची (Country Alliance Against China) वेळ आल्याचं विधान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी केले आहे. माईक पॉम्पिओंच्या या विधानातून चीनविरोधातल्या युद्धाचे संकेत मिळतात. कारण, चहूबाजूंनी नाकाबंदी केल्यानंतरही चीनच्या डोक्यावरचं युद्धाचं भूत अजून उतरलेलं नाही. म्हणूनच जिनपिंग यांच्याविरोधात जागतिक पातळीवर दिग्गज नेत्यांनी एकीची वज्रमूठ बांधली आहे.
चीनला अमेरिकेनं आतापर्यंत 4 वेळा इशारा दिला. विस्तारवादी धोरणाविरोधात हल्ल्याचीही धमकी देऊन पाहिली. मात्र चीनी ड्रॅगनची वृत्ती कुत्र्याच्या शेपटाप्रमाणेच राहिली. त्यामुळे इकडे अमेरिकेचाही संयम सुटत चालला आहे. म्हणून जिनपिंग यांच्यासोबत आता चर्चा किंवा भेटीगाठीची वेळ निघून गेल्याचं विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.
चीनची एकदाच खोड मोडण्यासाठी चिनी सरकारच्या अन्यायाला बळी पडलेल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या देशांना एकत्र केलं जातं आहे. कारण, थेट युद्ध पुकारण्याआधी पुन्हा एकदा व्यापाराचं हत्यार दाखवून चीनला शेवटची संधी सुद्धा द्यायची आहे. तरीसुद्धा चीनला शहाणपण आलं नाही. तर मात्र हल्ल्यावाचून कोणताच पर्याय नाही.
या देशांनी चीनविरोधी आवाज बुलंद केला आहे. या देशांपैकी पाच देशांनी समुद्रमार्गांवर चीनची घेराबंदी सुरु सुद्धा केली आहे. यात अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जपान, भारत या देशांचा समावेश आहे.
भारतानं जमिनीवर विस्तारवादी ड्रॅगनला रोखून धरलं आहे. तर अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटननं समुद्रात चीनला घेराव टाकला आहे.
सर्वात आधी लोकांच्या डोक्यात रशियाचं नाव येतं. कारण, रशिया आणि अमेरिकेत शत्रुत्व असल्यानं रशिया चीनला मदत करेल, असा अनेकांना वाटतं. मात्र रशिया आतापर्यंत तरी चीनबाबत तटस्थ राहिला आहे.
त्यामुळे चीनच्या बाजूनं पाकिस्तान आणि उत्तर कोरिया हे दोनच देश सध्या उभे आहेत. मात्र त्यातही पाकिस्तान दोलायमान अवस्थेत आहे. अमेरिकेनं डोळे वटारल्यानंतर पाकिस्तानला किमान वर-वर तरी चीनची साथ सोडावी लागेल.
तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंगचा… किम जोंग जितका सनकी आहे, तितकाच बेभरवश्याचा. कारण, विचारधारेनं जरी उत्तर कोरिया चीनशी सलगी करत असला तरी व्यापाऱ्याच्या दृष्टीनं एकाच वेळेला 9 देशांसोबत वैर घेणं उत्तर कोरियालाही परवडणारं नाही.
स्वतःच्या देशाविरोधात सुरु असणाऱ्या मोर्चेबांधणीबाबत चीनसुद्धा सतर्क आहे. मात्र व्यापारी दबावाच्या जोरावर अनेक देशांना आपण मुठीत ठेवू शकण्याचा भ्रम चीनला झालाय. जर चीन अजूनही वठणीवर आला नाही. तर संपूर्ण जगाला चीनच्या भ्रमाचा भोपळा फोडावा लागणार आहे. (Country Alliance Against China)
VIDEO : 36 जिल्हे 72 बातम्या | 18 July 2020https://t.co/EHHFbN8DPp
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 18, 2020
संबंधित बातम्या :
चीनचा हिंदमहासागरात भारताविरोधात नवा कट, भारताकडूनही चोख उत्तर
चीनला धूळ चारण्यासाठी जगातल्या चार सर्वात शक्तिशाली नौदलांची एकी, समुद्रात युद्धाभ्यास होणार