ऑफिसमध्ये 9 तास काम करताय, तर तुम्हाला ‘या’ आजारांचा सर्वाधिक धोका
ऑफिसमध्ये नऊ तास बसून काम केलं तर तुम्हाला डिप्रेशन आणि हर्ट अटॅक येऊ (Nine Hours duty in office) शकतो.
मुंबई : ऑफिसमध्ये नऊ तास बसून काम केलं तर तुम्हाला डिप्रेशन आणि हर्ट अटॅक येऊ (Nine Hours duty in office) शकतो. त्यासोबत हायपर टेन्शन, स्ट्रोक, डिप्रेशन, मसल्स पेन, बॅक पेन, सर्वाईकल आणि स्लिप डिस्कसारख्या समस्याचा त्रास होऊ शकतो. क्षमतेपेक्षा अधिक काम करणे हे तुमच्या आरोग्यासाठी घातक (Nine Hours duty in office) ठरु शकते.
प्रायव्हेट सेक्टरचे कर्मचारी टार्गेट आणि संधीच्या मागे धावत असतात. पगारवाढीसाठी ऑफिसमध्ये लवकर जाणे, उशीरापर्यंत बसणे, ब्रेक न घेणे, सुट्टीच्या दिवशीही ऑफिसला जाणे यामुळे कंपनी तुमची ग्रोथ करेल. पण आरोग्यासाठी हे घातक ठरु शकते.
एकटेपणा वाढतो
“दररोज अधिक काम केल्याने मित्र आणि कुटुंबासोबत कमी वेळ घालवता येतो. जे लोक 9 तास सलग काम करतात. त्यामुळे एकटेपणामध्ये वाढ होते. त्यामुळे कुटुंब आणि मित्रांमध्ये संवाद आणि मित्र-परिवारांमध्ये वेळेचा अभाव होतो”, असं मनोचिकित्सक राजेश गुप्ता यांनी सांगितले.
गुप्ता म्हणाले, “आमच्याकडे बऱ्याचदा अशी प्रकरणं समोर आली आहेत की, जे एकाच घरात राहूनही एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत. एक-मेकांमध्ये अंतर वाढते आणि हळू-हळू ते एकटे पडतात.”
एका रिसर्चमध्ये असं समोर आलं आहे की, भारतीय तरुण 8 तासांपेक्षा अधिक वेळ काम करतात. तसेच अधिक वेळेची शिफ्ट करतात. त्यामुळे त्यांचा तणाव वाढतो. तरुणांमध्ये निगेटिव्हिटी वाढत आहे कारण ते मानसिकरीत्या थकत आहेत. भारतीय तरुण ऑफिसमध्ये 52 तास देतात. तर जपानमध्ये 46 तास ऑफिसमध्ये दिले जातात.
चिडचिडपणामध्ये वाढ
तरुण मानसिकरीत्या थकत असल्यामुळे त्यांच्यात चिडचिडपणा वाढत आहे. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ मिळत नसल्यामुळे तरुण अॅक्टिव्ह राहात नाहीत. तसेच ते एकटे पडत आहेत. अनियमीत आणि अधिक काम केल्यामुळे त्यांना अनेक आजारांना समोरे जावे लागते, असं एका अभ्यासातून समोर आलं आहे.