15 हजार बुकिंग्सनंतर Nissan Magnite चा सर्वात कमी सर्विस कॉस्टचा दावा

Nissan Motors कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला त्यांची सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही Nissan Magnite भारतात लाँच केली आहे. कंपनीने ही एसयूव्ही (SUV) चार ट्रिम्समध्ये सादर केली आहे.

15 हजार बुकिंग्सनंतर Nissan Magnite चा सर्वात कमी सर्विस कॉस्टचा दावा
Follow us
| Updated on: Dec 20, 2020 | 8:21 PM

मुंबई : Nissan Magnite ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही भारतीयांच्या पसंतीस उतरली आहे. 3 डिसेंबर रोजी लाँच करण्यात आलेल्या या कारने आतापर्यंत 15 हजार बुकिंग्सचा टप्पा पार केला आहे, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. Nissan Magnite ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही 4.99 लाख रुपयांच्या किंमतीत (एक्स-शोरूम किंमंत) लाँच करण्यात आली आहे. ही इंट्रोडक्ट्ररी किंमत केवळ त्याच ग्राहकांसाठी आहे जे ग्राहक 31 डिसेंबरपर्यंत ही कार बुक करतील. त्यानंतर निसान मॅग्नाइटची एक्स शोरूम किंमत 5.54 लाख रुपये इतकी होणार आहे. ( Nissan Magnite after 15000 bookings makes new claim of lowest service cost)

गेल्या दोन महिन्यात या कारसाठी 1.50 लाख इन्क्वायरी आल्या आहेत. यासह कंपनीने आता अजून एक दावा केला आहे. त्यात कंपनीने म्हटले आहे की, कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या सेगमेंटमध्ये या गाडीची सर्व्हिस कॉस्ट सर्वात कमी आहे. Magnite दोन वर्षांच्या वॉरंटीसह (50,000 किलोमीटर) लाँच करण्यात आली आहे. ही वॉरंटी पाच वर्षांपर्यंत वाढवता येईल. कंपनीने दावा केला आहे की, मॅग्नाईट ज्या सेगमेंटमध्ये स्पर्धा करत आहे, त्यात 29 पैसे प्रति किलोमीटर (50,000 किलोमीटर पर्यंत) देखभाल खर्च हा सर्वात चांगला आणि स्वस्त आहे.

कंपनीने ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही चार ट्रिममध्ये सादर केली आहे. ज्यामध्ये XE, XL, XV आणि XV प्रिमियमसह एकूण 8 व्हेरिएंटचा समावेश असेल. मॅग्नाइटचे मायलेज 1.0 लीटर पेट्रोल 18.75kmpl, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल (MT) वर 20kmpl, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल (CVT) वर 17.7kmpl चे मायलेज देते. भारतात Nissan Magnite ची सुरूवातीची किंमत 4 लाख 99 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. निसान मॅग्नाइट ही एसयूव्ही 11 हजार रुपयांच्या टोकन अमाउंटवर बुक करता येईल.

दोन इंजिनांचा पर्याय

Nissan Magnite मध्ये दोन इंजिन ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यापैकी पहिलं नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असेल तर दुसरं टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. या SUV चं नॅचुरली एस्पिरेटेड इंजिन 999cc आहे, जे 6,250rpm वर 71 बीएचपी इतकी पॉवर जनरेट करु शकेल आणि 3,500rpm वर 96nm इतकं पीक टॉर्क जनरेट करु शकतं. हे इंजिन मॅन्युअल गियरबॉक्स आणि एएमटी ट्रान्समिशनसह सादर करण्यात आलं आहे. दुसरं इंजिन 1.० लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 5,000 आरपीएम वर 99 बीएचपीची पॉवर आणि 2,800 आरपीएम वर 160 एनएम टॉर्क जनरेट करु शकतं.

या एसयूव्हीच्या फिचर्समध्ये 8 इंचांची फ्लोटिंग टच स्क्रिन, 7 इंच टीएफटी मीटर, व्हॉइस रेकग्निशन, पुश बटन स्टार्ट, क्रुज कंट्रोल, 360 डिग्री अराऊंड व्ह्यू मॉनिटर, टायर प्रेशर मॉनिटर, 6 स्पीकर ऑडियो, ऑटोमॅटिक एसी, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आणि फोल्डेबल ओआरव्हीएमचा समावेश आहे.

Nissan Magnite मधील इतर खास फिचर्स

⦁ Nissan Magnite मध्ये Bi Projector LED हेडलँम्प्स देण्यात आले आहेत.

⦁ LED DRL, LED इंडिकेटर

⦁ 16 इंचाचे डायमंड कट अलॉय व्हील्स

⦁ व्हाइस रेकग्निशन, ऑटोमॅटिक एसी, क्रूज कंट्रोल, हाइट अडजस्टेबल ड्राइवर सीट, क्रूज कंट्रोल, वायरलेस चार्जर आणि एयर प्यूरिफायर सह जबरदस्त फीचर्स या कारमध्ये देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

Mahindra THAR चा मार्केटमध्ये धुमाकूळ, तरीही कंपनी कार बंद करण्याच्या विचारात?

नवीन MPV Suzuki Solio Bandit लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

टोयोटाची शानदार Innova Crysta लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

( Nissan Magnite after 15000 bookings makes new claim of lowest service cost)

...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.