ठरलं! Nissan Magnite ‘या’ दिवशी भारतात लाँच होणार, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

Nissan Motors पुढील महिन्यात त्यांची कॉम्पॅक्ट एसयूव्ही Nissan Magnite भारतात लाँच करणार आहे.

ठरलं! Nissan Magnite 'या' दिवशी भारतात लाँच होणार, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत
Follow us
| Updated on: Dec 03, 2020 | 10:51 AM

मुंबई : Nissan Motors कंपनी 2 डिसेंबर 2020 रोजी भारतात त्यांची कॉम्पॅक्ट एसयूव्ही Nissan Magnite लाँच करणार आहे. कंपनी ही एसयूव्ही (SUV) चार ट्रिम्समध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. तुम्ही ही कार खरेदी करणार असाल तर या कारची खासियत जाणून घ्या. (Nissan Magnite is going to launch on 2nd december; check price and specification)

कंपनी ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार चार ट्रिममध्ये लाँच करु शकते. ज्यामध्ये XE, XL, XV आणि XV प्रिमियमसह एकूण 8 व्हेरिएंटचा समावेश असेल. Nissan Magnite ची सुरुवातीची किंमत 5.50 लाख ते 8.15 लाख रुपयांपर्यंत असू शकते. यामध्ये अनेक सेगमेंट आणि फिचर्स असू शकतात.

Nissan Magnite मध्ये दोन इंजिन ऑप्शन्स दिले जातील. त्यापैकी पहिलं नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असेल तर दुसरं टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन असेल. या SUV चं नॅचुरली एस्पिरेटेड इंजिन 999cc असेल, 6,250rpm वर 71 बीएचपी इतकी पॉवर जनरेट करु शकेल आणि 3,500rpm वर 96nm इतकं पीक टॉर्क जनरेट करु शकतं. हे इंजिन मॅन्युअल गियरबॉक्स आणि एएमटी ट्रान्समिशनसह सादर करण्यात आलं आहे.

या एसयूव्हीच्या फिचर्समध्ये 8 इंचांची फ्लोटिंग टच स्क्रिन, 7 इंच टीएफटी मीटर, व्हॉइस रेकग्निशन, पुश बटन स्टार्ट, क्रुज कंट्रोल, 360 डिग्री अराऊंड व्ह्यू मॉनिटर, टायर प्रेशर मॉनिटर, 6 स्पीकर ऑडियो, ऑटोमॅटिक एसी, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आणि फोल्डेबल ओआरव्हीएमचा समावेश आहे.

Volkswagen भारतात 2 नव्या SUV लाँच करणार

Volkswagen कंपनी पुढील वर्षी भारतात 2 नव्या SUV लाँच करणार आहे. 2021 च्या पहिल्या सहामाहित Taigun मिड-साईज एसयूव्ही लाँच केली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरी एसयूव्ही कधी लाँच केली जाणार आहे, याबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. परंतु 2021 च्या दुसऱ्या सहामाहित दुसरी एसयूव्ही लाँच केली जाऊ शकते. दरम्यान सध्या अशा चर्चा आहेत की, फोक्सवॅगन कंपनी ह्युंदाई व्हेन्यू (Hyundai Venue), किया सोनेट (Kia Sonet), टाटा नेक्सॉन (Tata Nexon) आणि फोर्ड इकोस्पोर्टसारख्या (Ford EcoSport) गाड्यांच्या स्पर्धेत सब-4 सीटर एसयूव्ही लाँच करु शकते.

कंपनीने दावा केला आहे की, नवीन Taigun स्टायलिंग, टेक्नोलॉजी आणि सुरक्षेच्या बाबतीत मिड-साईज एसयूव्ही सेगमेंटचं रि-डिफाईन व्हर्जन असेल. या कारला 1.0 लीटर, 3 सिलिंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 1.5 लीटर TSI EVO इंजिनासह सादर केलं जाऊ शकतं. 1.0 लीटर इंजिनमध्ये 115bhp इतकी पॉवर आणि 200Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. तर 1.5 लीटर इंजिनमध्ये 148bhp पाॉवर आणि 250Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे.

संबंधित बातम्या

MG Motors च्या ‘या’ SUV ची मार्केटमध्ये धुम, तीन आठवड्यात रेकॉर्डब्रेक विक्री, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

अवघ्या नऊ महिन्यात ‘या’ SUV चे सर्व युनिट्स विकले; जाणून घ्या कारची किंमत आणि फिचर्स

SUV सेगमेंटमध्ये मारुतीचा धडाका; पाच शानदार कार लाँच होणार

(Nissan Magnite is going to launch on 2nd december; check price and specification)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.