खदखदखद लाव्हा रस… वऱ्हाडी भाषेत ऑनलाइन क्लास, मास्तर नितेश कराळे सोशल मीडियावर लोकप्रिय

नितेश कराळे यांनी यूट्युबवर व्हिडीओ अपलोड केले. त्यांचे प्रेक्षक वाढू लागले. वऱ्हाडी भाषा आवडल्याने मुंबईतील दोन विद्यार्थ्यांनी त्यांचे मीम्स केले आणि कराळे सर्वत्र व्हायरल केले.

खदखदखद लाव्हा रस... वऱ्हाडी भाषेत ऑनलाइन क्लास, मास्तर नितेश कराळे सोशल मीडियावर लोकप्रिय
Follow us
| Updated on: Aug 30, 2020 | 12:37 PM

वर्धा : आपल्या भाषेतून संपादन केलेले ज्ञान दीर्घकाळ स्मरणात राहते असे म्हणतात. विदर्भातील अशाच एका मास्तरांनी वऱ्हाडी बोलीतून साध्या-सोप्या संकल्पना शिकवण्याचा विडा उचलला आणि ते सोशल मीडियावर तुफान लोकप्रियही झाले. वर्ध्यातील या मास्तरांचे नाव आहे नितेश कराळे. (Nitesh Karale Wardha Teacher Teaching in Varhadi Language Online goes Viral)

वऱ्हाडी बोलीतून शिकवणाऱ्या वर्ध्यातील मास्तरने भाषा आणि शिक्षणाचा सुरेख मेळ घातला आहे. आता तुम्ही म्हणाल शिक्षकाला असं ‘मास्तर बिस्तर’ म्हणणं योग्य नाही. पण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मित्रांनो, जरा थांबा… कारण हे शिक्षकच स्वतः सांगत आहेत की शिक्षक या शब्दापेक्षा मास्तर हा शब्द जास्त लक्षात राहतो, आणि म्हणूनच मायबोलीतून आकर्षकपणे मिळणारे धडे यशही मिळवून देतात.

ऑफलाईन ते ऑनलाइन

कालपर्यंत ऑफलाईन असणारे हे गुरुजी कोरोना संकटामुळे ऑनलाइन झाले आणि आता तर ते नेटकऱ्यांमध्ये लोकप्रियही झाले. बीएससी बीएड शिक्षण झालेल्या नितेश कराळे यांनी स्वतः स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी पुण्यात क्लासेस केले. क्लास करुन नोकरीसाठी प्रयत्न केले, मात्र हाती निराशाच आली. मग 2013 मध्ये त्यांनी स्पर्धा परीक्षेचा पुणेरी पॅटर्न या पंचलाईनसह ‘फिनिक्स करियर डेव्हलपमेंट अकॅडमी’ नावानं वर्ध्यात क्लासेस सुरु केले.

गावात राहणाऱ्या कराळे यांना गावाची बोलीभाषा चांगलीच अवगत होती. याच अस्सल वऱ्हाडी बोलीचा शिकवताना पूर्णतः वापर केला. ऑफलाईन क्लास सुरु असताना देखील ते वऱ्हाडीतच शिकवत होते. त्यांनी आपल्या या वऱ्हाडी बोलीतून अनेकांना शिकवत शासकीय सेवेत नोकरीची वाटही खुली केली.

मीम्स व्हायरल, मास्तर फेमस

कोरोनाचं संकट येण्यापूर्वी कराळे 300 विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने शिकवायचे. मात्र कोरोनामुळे शासनाने लॉकडाऊन केलं आणि सुरु असलेले क्लासेस बंद पडले. मग काय, कराळे गुरुजींनी ऑनलाईन क्लास सुरु केले. सुरुवातीला गुगल मीट, झूम अ‍ॅपच्या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न केला पण तिथंही अडचणी आल्यानं त्यांनी यूट्युबवर व्हिडीओ अपलोड केले. हळूहळू त्यांचे प्रेक्षक वाढू लागले. यातूनच वऱ्हाडी भाषा आवडल्याने मुंबईतील दोन अनोळखी विद्यार्थ्यांनी दोन मिनिटांचे मीम्स केले आणि सर्वत्र व्हायरल केले.

व्हिडीओ व्हायरल होताच कराळे यांच्या वऱ्हाडी शिकवणीची सर्वत्र चर्चा सुरु झाली. ज्वालामुखी शिकवताना कराळे गुरुजींची बोली अस्सल वऱ्हाडी तर होतेच पण ती खदखदणाऱ्या ज्वालामधून उत्तरे मनात ठासून भरवते. मराठी बाण्याला मिळालेली वऱ्हाडीची साथ विदर्भातील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेत टक्का वाढवणारी ठरू शकते.

भूगोलातला लाव्हा रस, मराठीतले व्याकरण, इतिहास आणि गणित शिकवताना देखील त्यांच्या बोलीमुळे विद्यार्थ्यांना उत्तरे अगदीच लक्षात राहण्यात मदत होत आहे. आज या व्हिडीओचे लाखो दिवाने झाले आहेत. कराळे यांची स्टाईल प्रत्येकाला अवगत होईल असं नाही, पण हा फंडा लक्ष वेधून घेणारा ठरत आहे.

मास्तर नितेश कराळे यांच्याशी बातचीत

(Nitesh Karale Wardha Teacher Teaching in Varhadi Language Online goes Viral)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.