‘लागिरं झालं जी’ची जोडी पुन्हा एकत्र, अज्या-शीतली लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
नितीश आणि शिवानीचे ‘चाहूल’ हे नवे गाणे लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. पुन्हा एकदा ही जोडी पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्येही उत्साहाचे वातवरण आहे.
मुंबई : लोकप्रिय मालिका ‘लागिरं झालं जी’ची लाडकी जोडी ‘अज्या आणि शितली’ अर्थात अभिनेत्री शिवानी बावकर (Shivani Baokar) आणि अभिनेता नितीश चव्हाणची (Nitish Chavan) जोडी पुन्हा एकदा एका वेगळ्या अंदाजात झळकणार आहे. नितीश आणि शिवानीचे ‘चाहूल’ हे नवे गाणे लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. पुन्हा एकदा ही जोडी पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्येही उत्साहाचे वातवरण आहे (Nitish Chavan and Shivani Baokar New Song Chahul).
‘सजलं रूप तुझं, रुजलं बीज नवं, उधाण वारं हसतंय, धजलं तुझ्या म्होर, फसलं आता खरं, पाखरागत उडतंय…..’, अशा गावरान भाषेत प्रेमाचे बोल ओठावर आणत आणि मंत्रमुग्ध करून टाकणाऱ्या या गाण्याच्या बोलांनी तर जणू हृदयाचा ठोकाच चुकवला आहे. सध्या रसिक प्रेक्षकांत या रोमँटिक गाण्यांची क्रेझ जरा जास्तच दिसून येत आहे. म्हणूनच प्रेक्षकांच्या प्रेमापोटी हे प्रेमाचे तरल गीत एका म्युझिक व्हिडिओसह प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या गाण्याची आकर्षणाची बाजू म्हणजे ‘लागिरं झालं जी’ फेम शिवानी बावकर आणि नितीश चव्हाण म्हणजेच शीतली आणि अज्या यांची जोडी या गाण्यातून रोमँटिक अंदाजात दिसणार आहेत.
View this post on Instagram
(Nitish Chavan and Shivani Baokar New Song Chahul)
प्रेमाची अनोखी भावना…
प्रेम ही भावना मनात तरंग उमटवणारी आहे. आयुष्यात प्रत्येकजण एकदा तरी प्रेमातच पडतो आणि त्यानंतर तो हरवून जातो. आपल्यासाठी कुणीतरी असणं आणि त्याच्या प्रेमात वेडेपणाचा कळस गाठणं यातलं सुख प्रेमात पडल्याशिवाय उमगत नाही. अशा हव्याहव्याशा वाटणाऱ्या एका गुलाबी नात्याचे पदर उलगडणारे आणि प्रेमाच्या जगातील भावनांच्या हिंदोळ्यावर सफर घडवणारे एक प्रेमगीत अभिनेत्री शिवानी बावकर आणि अभिनेता नितीश चव्हाण प्रेक्षकांच्या भेटीस एका आगळ्या वेगळ्या अंदाजात घेऊन येत आहेत (Nitish Chavan and Shivani Baokar New Song Chahul.
प्रेम व्यक्त करण्याच्या भावनेला या गाण्यातून व्यक्त करण्यात आले आहे. अगदी गावरान आणि त्या गाण्याला साजेशा अशा नजाऱ्यांची कुठेही कमतरता आढळली नाही. ‘एव्ही प्रॉडक्शन’प्रस्तुत ‘मन उनाड’ या यशस्वी गाण्यानंतर त्यांचे हे नवेकोरे ‘चाहूल’ गाणं नक्कीच प्रेमाची चाहूल लावणारे आहे. ‘एव्ही प्रॉडक्शन’सह ‘मराठी म्युझिक टाऊन’ या म्युझिक लेबलने या गाण्याला प्रस्तुत केले असून, या म्युझिक लेबल अंतर्गत असलेलं हे पहिलेवहिलं गाणं आहे.
नितीश-शिवानीची जोडी पुन्हा पडद्यावर…
‘एव्ही प्रॉडक्शन’ आणि ‘मराठी म्युझिक टाऊन’प्रस्तुत मंगल पी, अभिजित आणि विश्वजित निर्मित तर, दिग्दर्शक ओंकार माने दिग्दर्शित या सुमधुर गाण्याला दिलेली नृत्याची जोड अगदी प्रसन्न करणारी आहे. ओंकार याआधी ‘बेखबर कशी तू’ या म्युझिक व्हिडिओ मधून प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या शिवाय ‘चंद्र झुल्यावर’, ‘तू ये साथीला’ याही गाण्यांची दिग्दर्शनाची धुराही ओंकारने सांभाळली.
निर्माता विश्वजितचे हे मराठी सृष्टीतील दुसरे निर्मित केलेले मराठी गाणे असून, याआधी त्याने ‘दिल बुद्धू’ या हिंदी गाण्यातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. आपल्या दमदार आणि सुमधुर आवाजात गायक विजय भाटे याने हे गाणे गायले आहे. तर, गाण्याचे बोल राहुल थोरात यांचे असून संगीतकार आशिष आणि विजय यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. शिवानी आणि नितीशची सुप्रसिद्ध जोडी पुन्हा एकदा ‘चाहूल’ या गाण्यातून सर्व प्रेमीयुगुलांसाठी एक पर्वणीच ठरेल.
(Nitish Chavan and Shivani Baokar New Song Chahul)