बिहारमध्ये भाजपचा चेहरा कोण? उपमुख्यमंत्रिपदासाठी ‘हे’ 4 चेहरे आघाडीवर
बिहारमध्ये भाजपचा चेहरा कोण असणार? भाजपकडून उपमुख्यमंत्री कुणाला दिले जाणार याविषयी प्रचंड सस्पेन्स तयार झालाय.
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि संयुक्त जनता दलाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळालं. यानंतर आता जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार हे निश्चित आहे. मात्र, बिहारमध्ये भाजपचा चेहरा कोण असणार? भाजपकडून उपमुख्यमंत्री कुणाला दिले जाणार याविषयी प्रचंड सस्पेन्स तयार झालाय. असं असलं तरी भाजपमधील 4 चेहरे या पदासाठी आघाडीवर आहेत. सर्वात पहिल्या क्रमांकावर भाजप विधीमंडळ नेते तारकिशोर प्रसाद यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2 उपमुख्यमंत्री निवडल्यास भाजप उपनेत्या रेणु देवी देखील उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत पुढे आहेत (Nityananda or Sanjay Jaiswal may be Deputy CM in Bihar government).
उपमुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत भाजपच्या या दोन नेत्यांशिवाय नित्यानंद राय आणि संजय जयस्वाल हे दोन नेते देखील चर्चेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपने नित्यानंद राय आणि संजय जयस्वाल या दोघांची नावं उपमुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांच्याकडे दिली आहेत. असं असलं तरी भाजपकडून या पदावर कोण असणार या नावांची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे या 4 पैकी कुणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, सध्या तारकिशोर प्रसाद सर्वात पुढे दिसत आहेत.
नित्यानंद राय, संजय जायसवाल आणि भाजप विधीमंडळ उपनेत्या रेणु देवी हेही या पदासाठी चर्चेत आहेत. मात्र, बिहारमधील जातीय समीकरणं देखील यात महत्त्वाची ठरु शकतात. संजय जयस्वाल उपमुख्यमंत्री झाले तर भाजपकडून पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी सवर्ण नेत्याला संधी दिली जाऊ शकते, असाही अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, नितीश कुमार सोमवारी (16 नोव्हेंबर) सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
संबंधित बातम्या :
एकेकाळी 7 दिवसात खुर्ची गेली, आता नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची सातव्यांदा शपथ घेणार
नितीश कुमार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड, सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार, सोमवारी शपथविधी
संबंधित व्हिडीओ :
Nityananda or Sanjay Jaiswal may be Deputy CM in Bihar government