‘ना फेरफटका, ना मॉर्निंग वॉक’, नागपूर लॉकडाऊननंतर तुकाराम मुंढेंचे कडक नियम

 कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठा निर्णय घेतला आहे (Tukaram Mundhe on Nagpur lockdown).

'ना फेरफटका, ना मॉर्निंग वॉक', नागपूर लॉकडाऊननंतर तुकाराम मुंढेंचे कडक नियम
Follow us
| Updated on: Mar 20, 2020 | 10:33 PM

नागपूर :  कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठा निर्णय घेतला आहे (Tukaram Mundhe on Nagpur lockdown). यानुसार नागपूर शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा आणि उद्योग बंद करण्याचे आदेश तुकाराम मुंढेंनी दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना 1 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात येणार आहे.

तुकाराम मुंढे आपल्या शिस्तप्रियतेसाठी ओळखले जातात. त्यामुळे आता नागपूरमध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर त्यांच्या या शिस्तीचा नागरिकांना अनुभव येणार आहे. एपिडमिक अॅक्टच्या नियम 10 नुसार मुंढे यांनी हा निर्णय घेतला आहे. यानुसार नागरिकांना केवळ आवश्यक गोष्टींसाठीच घराबाहेर येण्याची परवानगी देण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडू नये, अशा सक्त सुचना देण्यात आल्या.

पिण्याचे पाणी, सिव्हेज सर्व्हिस, फोन, दूध, भाजी, किराणा अशा काही मोजक्या गोष्टींना या लॉकडाऊनमध्ये काहीशी सूट देण्यात आली आहे. रेस्टॉरन्ट आणि हॉटेल्सवरही निर्बंध लादण्यात आले असले, तरी या ठिकाणी होम डिलिव्हरी करण्यास मुभा देण्यात आली आहे. ई कॉमर्स डिलिव्हरी, मीडिया, आय टीमधील अत्यावश्यक सेवा यांनाही काही प्रमाणात सूट असणार आहे.

लॉकडाऊनची घोषणा करताना तुकाराम मुंढे यांनी नागरिकांनी पॅनिक न होण्याचं आवाहन केलं आहे. तसेच नागरिकांनी कोरोनापासून बचावासाठी मॉर्निंग वॉकलाही घराबाहेर पडू नये, अशा सुचना दिल्या आहेत. अत्यावश्यक ठिकाणी बस सेवाही सुरु ठेवण्यात येणार आहेत. हे आदेश 31 मार्चपर्यंत लागू असतील. त्यानंतर आवश्यकतेनुसार याची मुदत वाढवण्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या:

कोरोनाचा प्रादुर्भाव तिसऱ्या टप्प्यात पोहोचू नये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींना विनंती

पुण्यात तीन दिवस व्यापार बंद, मात्र किराणा, दूध, औषधे, भाजीपाला सुरु राहणार

7000 मृत्यू, अमेरिकेत संचारबंदी, फ्रान्स लॉकडाऊन, कोरोनासमोर महाशक्तिशाली देशही हतबल

CoronaVirus: अमेरिकेत कोरोनावरील पहिल्या लसीची चाचणी, लवकरच बाजारात उपलब्ध होणार

संबंधित व्हिडीओ :

Tukaram Mundhe on Nagpur lockdown

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.