धक्कादायक…लोकलमध्ये फायर अलार्मच नाहीत, रेल्वेच्या मानक कंपनी आरडीएसओचे आदेश दोन वर्षे बासणात

मुंबई : रेल्वेच्या प्रवाशांना धक्का देणारी बातमी आहे. प्रवाशांनो रेल्वेतून प्रवास करताना यापुढे दैवावरच भरोसा ठेवावा अशी परिस्थिती आहे. कारण रेल्वेच्या डब्यात फायर अलार्मच नसल्याचे उघडकीस आले आहे. रेल्वेच्या मानक संस्थेने दोन वर्षांपासून कोचेसमध्ये स्मोक डिटेक्शन आणि फायर अलार्म बसविण्याचे आदेश दिले आहेत. परंतू रेल्वेने हे आदेश अक्षरश: धाब्यावर बसविले आहेत. दररोज लोकलमधून प्रवास करणाऱ्या […]

धक्कादायक...लोकलमध्ये फायर अलार्मच नाहीत, रेल्वेच्या मानक कंपनी आरडीएसओचे आदेश दोन वर्षे बासणात
ACLOCALImage Credit source: SOCIAL MEDIA
Follow us
| Updated on: Dec 06, 2022 | 1:07 PM

मुंबई : रेल्वेच्या प्रवाशांना धक्का देणारी बातमी आहे. प्रवाशांनो रेल्वेतून प्रवास करताना यापुढे दैवावरच भरोसा ठेवावा अशी परिस्थिती आहे. कारण रेल्वेच्या डब्यात फायर अलार्मच नसल्याचे उघडकीस आले आहे. रेल्वेच्या मानक संस्थेने दोन वर्षांपासून कोचेसमध्ये स्मोक डिटेक्शन आणि फायर अलार्म बसविण्याचे आदेश दिले आहेत. परंतू रेल्वेने हे आदेश अक्षरश: धाब्यावर बसविले आहेत.

दररोज लोकलमधून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना काळजीत टाकणारी बातमी आहे. मुंबईकरांची लाईफ लाईन लोकलमध्ये स्वयंचलीत आग प्रतिबंधक यंत्रणा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईकर रोज लोकल ट्रेनमधून अगदी निर्धास्तपणे प्रवास करीत असतात, त्यांच्यासाठी ही धक्कादायक बातमी आहे.

रेल्वेच्या पारंपारीक लोकलमध्ये फायर अलार्म नाहीत तर निदान नव्या आधुनिक वातानुकूलित लोकलमध्ये तरी ही यंत्रणा बसविण्यात यावी अशी मागणी रेल्वेची लखनऊ येथील मानक कंपनी ‘रिसर्च डिझाईन अ‍ॅण्ड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन’ने ( आरडीएसओ ) दोन वर्षांपासून केली आहे. मात्र या सूचनेला रेल्वेने चक्क हरताळ फासला आहे.

मुंबईकरांना एसी लोकल पुरविताना त्यात अनेक सुधारणा करण्याच्या सूचना लखनऊ येथील आरडीएसओने केल्या आहेत. रेल्वेच्या कारखान्यात नव्या युगाच्या वातानुकूलीत लोकलची बांधणी करताना त्यात ‘स्मोक डिटेक्शन आणि फायर अलार्म’ बसविण्यात यावेत असे आरडीएसओने दोन वर्षांपूर्वी सांगितले होते. परंतू त्याची अमलबजावणी झाली नसल्याने रेल्वेच्या या मानक संस्थेने नाराजी व्यक्त केली आहे.

आतापर्यंतच्या एसी लोकलमध्ये ही यंत्रणा नसली तरी निदान भविष्यातील एसी लोकलमध्ये तरी ‘स्मोक डिटेक्शन आणि फायर अलार्म’ बसविण्यात यावेत अशा सूचना आरडीएसओने 9  मार्च 2022 च्या पत्राद्वारे केल्या आहेत. तसेच जुन्या एसी लोकलमध्ये देखील ही यंत्रणा बसविण्यात यावी असे आदेश आरडीएसओने दिले आहेत.

नव्या एसी लोकलची बांधणी करताना आरडीएसओने आणखी काही सूचना दिल्या आहेत. त्यात एसी लोकलच्या डब्यांच्या पायऱ्या आतल्या बाजूस आहेत. त्यामुळे आपात्कालिन स्थितीत महिला वर्ग तसेच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या गैरसोयीच्या असल्याने त्याचे डीझाईन बदलण्याचे आदेशही चेन्नईच्या आयसीएफ रेल कोच फॅक्टरींना दिले आहेत.

एसी लोकलच्या मोटरमनच्या केबिनमध्ये ‘व्हिजिलन्स कंट्रोल डिव्हाईस’ बसविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जुन्या रिट्रोफिटेट लोकलमध्ये देखील ही यंत्रणा बसविण्यात यावी असे आरडीएसओने स्पष्ट केले आहे. एखादा अपघात किंवा अनपेक्षित घटना घडल्यास प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे ‘व्हिजिलन्स कंट्रोल डिव्हाईस’ गरजेचे असल्याचे आरडीएसओने स्पष्ट केले आहे.

ड्रायव्हर आणि गार्डमध्ये आपात्कालिन स्थितीत संपर्क होण्यासाठी इमर्जन्सी टॉक बॅक यंत्रणा बसविण्यात यावी त्यात एक तासांचे संभाषण रेकॉर्डींगची सुविधा असावी असे या मानक संस्थेने स्पष्ट केले आहे. दोन कोचेस मधील जागेत प्रवासी घसरू नयेत यासाठी तेथील फरशीचा भाग खरबडीत असावा असे म्हटले आहे.

आपात्कालीन स्थितीत एसी लोकलचे स्वयंचलीत दरवाजे उघडताना आणि बंद करण्यापूर्वी, तसेच येणाऱ्या पुढील स्थानकाची उद्घोषणा लोकलमध्ये पर्सनल असिस्टंट सिस्टीमद्वारे व्हावी, नव्या एसी लोकल आणि मेमू ट्रेनमध्ये देखील मेट्रोप्रमाणे एका डब्यापासून शेवटच्या डब्यापर्यंत प्रवाशांना जाता यावे यासाठी ‘वेस्टीब्युल’ ( गँगवे ) प्रवेश असावा.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.