मनोज जरांगे यांच्या तोंडातून तुतारी वाजत्ये – नितेश राणे
देवेंद्र फडणवीसमध्ये दम नाही. पोलिसांच्या आडून करतायत सगळं, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी निशणा साधला. मात्र त्यांच्या या टीकेला भाजप नेते नितेश राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. 'मनोज जरांगे यांच्या तोंडातून सध्या तुतारी वाजत्ये अस वाटतंय. जरांगे यांनी माफी मागावी' अशी मागणी नितेश राणे यांनी केली.
मुंबई | 26 फेब्रुवारी 2024 : देवेंद्र फडणवीसमध्ये दम नाही. पोलिसांच्या आडून करतायत सगळं, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी निशणा साधला. मात्र त्यांच्या या टीकेला भाजप नेते नितेश राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केल्याने भाजप नेतेही संतापले आहेत. त्यांनी जरांगेंना गंभीर इशारा दिला आहे. ‘मनोज जरांगे यांच्या तोंडातून सध्या तुतारी वाजत्ये अस वाटतंय. जरांगे यांनी माफी मागावी’ अशी मागणी नितेश राणे यांनी केली. फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी मनोज जरांगेंना 100 जन्म घ्यावे लागतील , त्यांनी वापरलेली भाषा योग्य नव्हती असेही त म्हणाले.
मराठा आरक्षणावरून राज्यातलं वातावरण पुन्हा पेटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. फडणवीस यांचा मला मारण्याचा कट आहे. सलाईनमधून विष देण्याचा कट रचलेला आहे. त्यामुळेच मी सलाईन घेणं बंद केलं आहे, असा गंभीर आरोप त्यांनी काल केला होता. त्यानंतर आज सकाळी त्यांनी पुन्हा फडणवीसांवर टीका केली. देवेंद्र फडणवीसमध्ये दम नाही. ते पोलिसांच्या आडून करत आहेत सगळं असा आरोप त्यांनी पुन्हा केला.
मनोज जरांगे यांच्या तोंडातून तुतारी वाजत्ये
याच मुद्यावरून बोलताना भाजप नेते नितेश राणे यांनी जरांगेंना थेट सुनावलं. जरांगे हे पवार गटाच्या जवळचे आहेत, ते कुणाच्या जीवावर शिव्या-शाप देत आहेत. त्यांच्या तोंडून सध्या तुतारी वाजत्ये. असा आरोप त्यांनी केला. जरांगेनी राजकारण सोडून भूमिका घ्यावी, असे नितेश राणे म्हणाले. जरांगे पाटील फक्त देवेंद्र फडणवीसांवरच टीका का करतात, जी टीका शरद पवार गटातले नेते करतात, जी भाषा उद्धव ठाकरे भाषणाच्या माध्यमातून वापरतात, तीच भाषा जरांगे पाटील करतात. सेम टू सेम, त्यांचं भाषण कॉपी आणि पेस्ट केलं आहे, असा टोला त्यांनी हाणला.
एका माजी मुख्यमंत्र्याला , सध्या सन्माननीय उपमुख्यमंत्र्याला उद्देशून शिव्या दिल्या जात आहेत आणि कोणीच काही हरकत घेतली नाही, हे कसं चालतं, असा सवालही राणे यांनी उपस्थित केला. अनेक मराठा संघटनांनी आंदोलनं केली पण कुणाची भाषा घसरली नाही. मनोज जरांगे यांची नार्को टेस्ट करा असी मागणी नितेश राणेंनी केली.