‘कोरोना’ला आळा घातल्याबद्दल अभिनंदन! किम जोंगचा जिनपिंग यांना व्यक्तीगत संदेश

कोरोना व्हायरसची साथ ही युद्धासारखी होती, मात्र तिला आळा घालण्यात चीन यशस्वी होत आहे, यासाठी किमने शी जिनपिंग यांचं कौतुक केलं (Kim Jong-un praises Xi Jinping over China coronavirus success)

'कोरोना'ला आळा घातल्याबद्दल अभिनंदन! किम जोंगचा जिनपिंग यांना व्यक्तीगत संदेश
Follow us
| Updated on: May 08, 2020 | 3:26 PM

प्योंग्यांग (Pyongyang) : उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याने चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना व्यक्तीगत संदेश पाठवला. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यात यशस्वी झाल्याबद्दल किम जोंगने चीनचे कौतुक केल्याचं वृत्त आहे. (Kim Jong-un praises Xi Jinping over China coronavirus success)

किमने शी जिनपिंग यांचे अभिनंदन केले. कोरोना व्हायरसची साथ ही युद्धासारखी होती, मात्र तिला आळा घालण्यात चीन यशस्वी होत आहे. चिनी जनता हे यश कायम राखेल आणि जिनपिंग यांच्या मार्गदर्शनाखाली विजयी होईल, अशा सदिच्छाही किम यांनी व्यक्त केल्या. तसेच शी जिनपिंग यांच्या आरोग्यासाठीही किम यांनी शुभेच्छा दिल्या. किमने हा मौखिक संदेश नेमका कोणत्या माध्यमातून जिनपिंग यांच्याकडे पाठवण्यात आला, हे स्पष्ट नाही.

चीनच्या अध्यक्षांना किमने संदेश पाठवण्याची ही या वर्षातली दुसरी वेळ आहे. जानेवारीत त्यांनी कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत चीनला पाठिंबा दर्शविला होता. उत्तर कोरियाचा व्यापार चीनवर अवलंबून असल्याने दोन्ही देशांचे घनिष्ठ संबंध आहेत.

किम जोंग उनची ‘दबंग’ एण्ट्री

किम जोंग उनने गेल्याच आठवड्यात (2 मे) झोकात एण्ट्री घेत आपल्या प्रकृतीविषयीच्या सर्व उलटसुलट अफवांना पूर्णविराम दिला होता. जवळपास तीन आठवडे गायब असलेल्या किम जोंग उनने सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी किमचं जंगी स्वागत करण्यात आलं.

किम जोंग उन यापूर्वी 12 एप्रिललाला सार्वजनिक कार्यक्रमात दिसला होता. त्यानंतर किमवर 12 एप्रिल रोजीच हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी शस्त्रक्रिया झाल्याचे वृत्त उत्तर कोरियातील बातम्या पुरवणाऱ्या दक्षिण कोरियामधील ‘डेली एनके’ या ऑनलाइन वृत्तपत्राने दिले होते.

उत्तर कोरियाचे पितामह किम द्वितीय सुंग यांची जयंती असल्याने 15 एप्रिल हा देशातील सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. मात्र, जयंती उत्सवाला किम जोंग उन गैरहजर होता. त्याच्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती न आल्याने आश्चर्य व्यक्त केलं गेलं. यामुळेच किमच्या आरोग्याबद्दल उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती.

किमला पुन्हा पाहून जनतेमध्ये उत्साह

किमने खत कंपनीचं उद्धाटन करुन उपस्थित जनतेला हात दाखवून अभिवादन केलं. यावेळी नागरिकांनी जल्लोषात स्वागत केलं. टाळ्या वाजवून, झेंडे फडकावून लोकांनी किम जोंगचं स्वागत केलं.

संबंधित बातम्या 

उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उनची प्रकृती चिंताजनक, अमेरिकन वृत्तपत्रांचा दावा

(Kim Jong-un praises Xi Jinping over China coronavirus success)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.