किम जोंग उनची क्रूरता, जनरलला हिंस्र माशांच्या तलावात फेकलं
उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांनी आपल्या जनरलची नरभक्षी पिरान्हा माशांच्या तलावात फेकून निर्घृण हत्या केली आहे.
सेऊल : उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांनी आपल्या जनरलची नरभक्षी पिरान्हा माशांच्या तलावात फेकून निर्घृण हत्या केली आहे. जनरलवर किम जोंग यांच्या विरुद्ध षडयंत्र रचल्याचा आरोप होता. ही माहिती जोंग यांना कळताच त्यांनी जनरल याची निर्घृण प्रकारे हत्या केली आहे. नुकतेच जोंग यांनी अमेरिकेत आपल्या दुतांसह पाच अधिकाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती.
मृत्यूचे कारण अस्पष्ट
किम जोंग यांच्या क्रूर निर्णयांची जगभरात जोरदार चर्चा सुरु आहे. प्रत्येकजण जोंग यांच्यावर टीका करत आहेत. जनरल यांना माशांच्या हल्ल्यानंतर मारले, त्यांच्यावर चाकूने हल्ला केला की त्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे, याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.
ब्राझीलवरुन पिरान्हा माशांची खरेदी
किम जोंग उन यांनी ब्राझीलवरुन पिरान्हा माशांची खरेदी केली असल्याचे म्हटलं जात आहे. पिरान्हा मासा हा जगातील सर्वात नरभक्षी आणि हिंस्र मासा आहे. या माशांच्या दातांना खूप धार असते. या दातांनी ते एका माणसाला कापू शकतात. माणसांसाठी हा मासा धोकादायक आहे.
निर्घृण हत्येची प्रकरणं
किम जोंग हे आपल्या सहकाऱ्यांना खास संदेश देण्यासाठी निर्घृण हत्येच्या पद्धतीचा वापर करतात. जोंग यामधून संदेश देतात की, जे कुणी माझ्यासोबत विश्वासघात करेल त्याला मी अशी शिक्षा देईल. किम जोंग यांनी आपल्या घरातील काही सदस्यांना आणि सरकारी अधिकाऱ्यांनाही मारुन टाकलं आहे. याचे कारण असे की, जोंग यांच्या भाषणावेळी त्यांनी टाळ्या वाजवल्या नव्हत्या. या छोट्याश्या कारणामुळे त्यांनी आपल्या जवळील लोकांना मृत्यूदंड दिला होता, असं म्हटलं जाते.