भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस कवरत्ती’, पाणबुडीविरोधी युद्धनौका निर्मितीमध्ये भारताला मोठं यश

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आज आयएनएस कवरत्ती ही युद्धनौका दाखल होणार आहे. भारतीय सैन्य प्रमुख जनरल एम.एम नरवणे यांच्या हस्ते ही युद्धनौका नौदलाकडून सुपूर्द करण्यात येईल. आयएनएस कवरत्ती ही युद्धनौका पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे.

भारतीय नौदलाच्या ताफ्यात 'आयएनएस कवरत्ती', पाणबुडीविरोधी युद्धनौका निर्मितीमध्ये भारताला मोठं यश
Follow us
| Updated on: Oct 22, 2020 | 9:03 AM

विशाखापट्टणम: भारतीय सैन्य प्रमुख जनरल एम.एम नरवणे आज विशाखापट्टणम इथं ‘आयएनएस कवरत्ती’ ही युद्धनौका नौदलाला सुपूर्द करणार आहेत. त्यामुळं भारतीय नौदलाची ताकद अजून वाढणार आहे. ‘आयएनएस कवरत्ती’ प्रोजेक्ट-28 अंतर्गत पूर्णपणे भारतीय बनावटीची पानबुडी विरोधी युद्धनौका आहे. यापूर्वीअशाच प्रकारच्या तीन युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. (The INS Karavatti warship will arrive in Indian navy today)

‘आयएनएस कवरत्ती’ची संरचना भारतीय नौदलाच्या नौसेना डिझाईन महासंचालनालय अर्थात DND या संस्थेनं तयार केली आहे. तर कवरत्तीची बांधणी कोलकात्यातील गार्डन रीच शिपबिल्डर्स एन्ड इंडीनियर्सकडून करण्यात आली आहे. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘आयएनएस कवरत्ती’ला पाणबुड्यांचा शोध घेणं आणि त्या उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय बनावटीचे अत्याधुनिक शस्त्रास्त्र आणि सेंसर सूट क्षमतेनं सज्ज करण्यात आलं आहे.

पाणबुडीविरोधीत युद्ध क्षमता वाढवण्यासाठी ‘आयएनएस कवरत्ती’ एका विश्वसनीय सेल्फ डिफेन्स यंत्रणेनं परिपूर्ण आहे. तसंच ही युद्धनौका लांब पल्ल्याच्या अभियानासाठी उपयुक्त असल्याची माहिती नौदलाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. नौदलाच्या माहितीनुसार ‘आयएनएस कवरत्ती’मधील 90 टक्के यंत्रणा ही पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे. महत्वाची बाब म्हणजे या युद्धनौकेच्या सुपरस्ट्रक्चरच्या निर्मितीसाठी कार्बन कंपोझिटचा उपयोग करण्यात आला आहे. जो भारतीय युद्धनौका निर्मितीच्या इतिहासात मोठं यश मानलं जात आहे.

‘सायलन्ट किलर’ही नौदलाच्या ताफ्यात

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थित 28 सप्टेंबर २०१९ रोजी आयएनएस खंडेरी पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली होती. आयएनएस खंडेरीमुळे नौदलाची ताकद वाढली आहे. या पाणबुडीला ‘सायलन्ट किलर’असंही म्हटलं जातं. आयएनएस खंडेरी पाणबुडी भारताची दुसरी स्कॉर्पियन वर्गातील पाणबुडी आहे. या पाणबुडीला पी-17 शिवालिक वर्गातील युद्धनौकेसोबत नौदलात दाखल करण्यात आलं.

INS खंडेरी पाणबुडी नौदलात दाखल, सायलन्ट किलरने ताकद वाढणार

INS Viraat | आयएनएस विराटचा अखेरचा प्रवास, मुंबईहून अलंग बंदराकडे रवाना

The INS Karavatti warship will arrive in Indian navy today

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.