स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना

दिल्ली विद्यापीठात अभाविपकडून बसवण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना
Follow us
| Updated on: Aug 23, 2019 | 1:53 PM

नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार दिल्ली विद्यापीठात घडला आहे. सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह यांच्या पुतळ्याशेजारी सावरकरांचा पुतळा बसवण्यावरुन वाद झाला होता. त्यानंतर काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआयच्या (National Students’ Union of India- NSUI) दिल्ली अध्यक्षाने पुतळ्याची विटंबना केली.

भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचा दिल्ली अध्यक्ष अक्षय लाक्रा याने गुरुवारी सावरकरांच्या पुतळ्याला काळं फासून चपलांचा हार घातला.

दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचा अध्य़क्ष, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) च्या शक्ती सिंग यांनी मंगळवारी सावरकर, भगतसिंह आणि बोस यांचे अर्धाकृती पुतळ्यांचं अनावरण केलं. दिल्ली विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांकडून परवानगी न घेता उत्तर कॅम्पसमध्ये हे पुतळे बसवण्यात आले होते.

‘सावरकर देशद्रोही होते. ते गांधीजींच्या हत्येमध्ये सहभागी होते. आणि तुम्ही भगत सिंह आणि सुभाष चंद्र बोस यांच्यासारख्या स्वातंत्र्य सेनानींच्या शेजारी सावरकरांचा पुतळा बसवता?’ असा प्रश्न एनएसयूआय अध्यक्ष अक्षय लाक्राने उपस्थित करत पुतळ्याला काळं फासलं.

अनधिकृतपणे पुतळा बसवल्याची तक्रार पोलिस आणि विद्यापीठाकडे केल्यानंतर 48 तास उलटून गेले, तरीही कोणतीच कारवाई केलेली नाही, असा दावा एनएसयूआयच्या सदस्यांनी केला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.