Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INS Arighat | भारताची आण्विक पाणबुडी ‘अरिघात’ सज्ज, पाकिस्तानसह चीनच्या चिंतेत वाढ

INS अरिघात ही भारताकडची दुसरी आण्विक पाणबुडी असेल. जी पुढच्या 2 ते 3 महिन्यात समुद्रात दाखल होईल.

INS Arighat | भारताची आण्विक पाणबुडी 'अरिघात' सज्ज, पाकिस्तानसह चीनच्या चिंतेत वाढ
Follow us
| Updated on: Sep 08, 2020 | 9:36 PM

मुंबई : चिनी नौदलाची वाढती ताकद पाहून भारतही सज्ज झाला आहे (Nuclear-Powered Submarine INS Arighat). भविष्यातला धोका ओळखून अनेक विध्वंसक शस्रं नौदलात दाखल केली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय नौदलात सर्वशक्तिमान शस्र दाखल होतं आहे (Nuclear-Powered Submarine INS Arighat).

INS अरिघात ही भारताकडची दुसरी आण्विक पाणबुडी असेल. जी पुढच्या 2 ते 3 महिन्यात समुद्रात दाखल होईल. मागच्या 3 वर्षांपासून अरिघातची चाचणी सुरु होती. ती चाचणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे या वर्षातच भारताची INS ”अरिघात” शत्रूवर आघात करण्यासाठी सज्ज असेल. अरिघात पाणबुडी सज्ज होताच चीन आणि खासकरुन पाकिस्तानच्या चिंता मात्र वाढणार आहेत.

INS ‘अरिघात’ची निर्मिती अत्यंत गुप्तपणे केली गेली. 2017 मध्ये या पाणबुडीचं लाँचिंग सुद्धा गुप्त ठेवलं गेलं होतं. लाँचिंगआधी पाणबुडीचं नाव INS अरिदमन होतं. लाँचिंगवेळी त्यात बदल करुन INS अरिघात केलं गेलं.

अरिघात पाणबुडीबाबत जी माहिती समोर आली आहे, त्यानुसार डिसेंबरमध्ये अरिघात पाणबुडी नौदलाला सुपूर्त केली जाईल. ही पाणबुडी अरिहंत क्लासमधलीच दुसरी पाणबुडी असली, तरी INS अरिहंतहून कैक पट घातक आहे. विशाखापट्टनमच्या शिपबिल्डिंग सेंटरमध्ये अरिघातची निर्मिती केली गेली. बनावट आणि माऱ्याच्या अनोख्या तत्रंज्ञानामुळे अरिघात पाणबुडी भारतीय नौदलाकडचं ब्रह्मास्र ठरेल (Nuclear-Powered Submarine INS Arighat).

INS अरिघातची वैशिष्ट्ये

  • INS अरिघात मध्ये 7 ब्लेडवाला प्रोपेलर आहे.
  • ही पाणबुडी प्रेशराईज्ड पाण्याच्या रिअॅक्टरवर चालते.
  • आतापर्यंतची भारताची सर्वात वेगवान पाणबुडी आहे.
  • समुद्रावर पाणबुडीचा वेग 12 ते 15 नॉटिकल मैल असेल.
  • तर खोल पाण्यातला वेग 24 नॉट्सपर्यंत जाईल.

म्हणजे समुद्राच्या पाण्यावर अरिघात ताशी 22 ते 28 किलोमीटर तर समुद्राच्या आतमध्ये ताशी 44 किलोमीटर वेगानं धावेल. तिचा हा वेगच शत्रूला चकवा देण्यासाठी महत्वाचा आहे. मात्र, फक्त वेगच नाही, तर इतर असंख्य खुब्यांनी INS अरिघात परिपूर्ण आहे.

INS अरिघातमध्ये अरिहंतप्रमाणेही 4 लॉन्च ट्यूब आहेत. मात्र, शस्त्रांची क्षमता INS अरिहंतपेक्षा दुप्पट आहे. अरिघातमध्ये 12 K-15 सागरिका मिसाईल्स असतील. K-15 सागरिका मिसाईलची रेंज 750 किलोमीटरपर्यंत आहे. त्याशिवाय, या पाणबुडीला K-4 मिसाईल सुद्धा असेल. जिची माऱ्याची क्षमता तब्बल 3500 किलोमीटरपर्यंत आहे.

सध्या K-4 मिसाईल बनवण्याचं काम सुरु आहे. अरिघात सोपवल्यानंतरच्या काही महिन्यातच K-4 मिसाईलला नौदलाला दिली जाणार आहे. त्यामुळे भारतीय नौदलाकडे आता अणुहल्ला करणाऱ्या दोन पाणबुड्या असतील. सध्या भारताकडे एक युद्धनौका आहे. लवकरच एक युद्धनौकाही मिळणार आहे.

Nuclear-Powered Submarine INS Arighat

संबंधित बातम्या :

LAC वरच्या सैनिकांचा आत्मविश्वास हिमालयाएवढा; फक्त आदेशाची गरज : लष्करप्रमुख नरवणे

मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार.
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्...
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्....