परवानगीशिवाय फोटोचा वापर, नुसरत जहाकडून पोलिसात तक्रार
अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहाने एका व्हिडीओ चॅट अॅपच्या विरोधात पोलिसात तक्रार केली आहे (Nusarat Jahan on Video Chat app).
कोलकाता : अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहाने एका व्हिडीओ चॅट अॅपच्या विरोधात पोलिसात तक्रार केली आहे (Nusarat Jahan on Video Chat app). नुसरतच्या परवानगीशिवाय या अॅपने तिचा फोटो वापरल्यामुळे त्या अॅप विरोधात तक्रार करण्यात आली आहे (Nusarat Jahan on Video Chat app).
एका व्हिडीओ चॅट अॅपने प्रमोशनसाठी नुसरत जहाच्या फोटोचा वापर केला. फोटोचा वापर करण्यापूर्वी नुसरतची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे नुसरतने सोमवारी (21 सप्टेंबर) कोलकाता पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
This is totally unacceptable – using pictures without consent. Would request the Cyber Cell of @KolkataPolice to kindly look into the same. I am ready to take this up legally. ?@CPKolkata https://t.co/KBgXLwSjR4
— Nusrat Jahan Ruhi (@nusratchirps) September 21, 2020
“माझ्या परवानगीशिवाय फोटोचा वापर करणे पूर्णपणे चुकीचं आहे. कोलकाता पोलिसांच्या सायबर सेलला याबाबत तक्रार केली आहे. मी कायद्यानुसार हे प्रकरण पुढे घेऊन जाण्यास तयार आहे”, असं ट्वीट नुसरत जहाने केलं आहे.
आपल्या ट्वीटमध्ये नसुरतने कोलकाता पोलीस आयुक्तांनाही टॅग केलं आहे. कोलकाता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणावर म्हटले की, “सायबर सेल याची पूर्णपणे चौकशी सुरु केली आहे”.
नुसरत जहाने व्हिडीओ चॅट अॅपचा स्क्रीनशॉटही पोस्ट केला आहे. या अॅपमध्ये नुसरतच्या फोटोचा वापर केला आहे आणि लॉकडाऊनमध्ये घरी बसून बनवा नवीन दोस्त असं यामध्ये म्हटले आहे.
संबंधित बातम्या :
खासदार नुसरत जहांनी बलात्काऱ्यांना शिक्षेसाठी जालीम उपाय सुचवला