ओबीसी समाजाचा गुहागर तहसील कार्यालयावर मोर्चा; जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी

जिल्ह्यातील ओबीसी सामाजाने गुहागर तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी आरक्षण बचावच्या घोषणा देत जातीनिहाय जनगणनेची मागणी केली.

ओबीसी समाजाचा गुहागर तहसील कार्यालयावर मोर्चा; जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 10:42 PM

रत्नागिरी : आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आणि ओबीसी समाज आक्रमक झाले आहेत. अशातच जिल्ह्यातील ओबीसी समाजाने गुहागर तहसील कार्यालयासमोर आरक्षण बचाव आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी आरक्षण बचावच्या घोषणा देत जातीनिहाय जनगणनेची मागणी केली. (OBC community Demand for caste wise census in Guhagar)

मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजामध्ये असंतोष आहे. ओबीसी समाजाचीही सारखीच स्थिती आहे. यावेळी गुहागर येथे ओबीसी समाजाने आरक्षण बचावची मागणी करत इतरही मागण्या केल्या केल्या आहेत. यावेळी ओबीसी समाजाचे आंदोलक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

ओबीसी सामाजाची जातीनिहाय जनगणना करावी. ज्यामुळे ओबीसींची प्रत्यक्ष संख्या समजण्यास मदत होईल. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण नको. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला भरीव मदत देण्यात यावी. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी. सर्व प्रकारच्या सेवा भरतींवरील स्थगिती उठवावी, अशा मागण्या यावेळी आंदोलकांकडून करण्यात आल्या.

दरम्यान, गुहागर ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी ओबीसी प्रवर्गातील सर्व समाजाचे आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलकांच्या शिष्टमंडळाने गुहागर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, यांना निवेदन सादर करुन आपल्या मागण्या शासनासमोर मांडल्या.

संबंधित बातम्या :

Pune OBC Andolan | पुण्यात ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन, आरक्षणप्रश्नी संघटना आक्रमक

मराठा आरक्षणावर आता तुम्हीच मार्ग काढा; मराठा आंदोलक शरद पवारांना भेटणार

मराठा आरक्षण समितीवरून चव्हाणांना हटवून एकनाथ शिंदेंना अध्यक्ष करा; नरेंद्र पाटील यांची मागणी

(OBC community Demand for caste wise census in Guhagar)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.