Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न झाल्यास…, प्रकाश शेंडगेंचा ठाकरे सरकारला इशारा

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न झाल्यास राज्यातील ओबीसी आणि भटके विमुक्त समाज पेटून उठेल, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी राज्य सरकारला दिला.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न झाल्यास..., प्रकाश शेंडगेंचा ठाकरे सरकारला इशारा
Follow us
| Updated on: Oct 31, 2020 | 3:02 PM

मुंबई : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न झाल्यास राज्यातील ओबीसी आणि भटके विमुक्त समाज पेटून उठेल. या समाजाचा आक्रोश मग सरकारला पाहायला मिळेल, असा गर्भित इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी ठाकरे सरकारला दिला. (OBC Leader Prakash Shendge Warning Thackeray Government Over Maratha reservation)

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा कोणताही प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने पारित करु नये. जर सरकारने तसा प्रस्ताव पारित करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यासंबंधी काही पावले उचलली तर ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचा आक्रोश होईल, असा इशारा शेंडगे यांनी राज्य सरकारला दिला.

मराठा समाजातील काही संघटना, नेतेमंडळी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं गेलं पाहिजे, अशी मागणी करत आहेत. अशी मागणी करुन हे नेते महाराष्ट्रातलं सामाजिक सलोख्याचं वातावरण बिघडवण्याचं काम करत आहेत, असा घणाघात शेंडगे यांनी केला.

प्रकाश शेंडगे म्हणाले, “SEBC कायदा करुन जे मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं हे बेकायदेशीर आहे, असा जावईशोध काही संघटना आणि नेत्यांनी लावलेला आहे… आता त्यांना उपरती झाली. ज्या दिवशी हा कायदा पास केला गेला, ज्या दिवशी राज्यपालांची सही झाली त्यादिवशी याच मंडळींनी महाराष्ट्रात जल्लोष केला, ढोल वाजवले, गुलाल उधळला, पेढे वाटले, साखर खाल्ली…आणि आज मात्र त्याच कायद्याला हे बेकायदेशीर आहे, असं म्हणून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर ओबीसीमधूनच…, अश्या प्रकारची भाषा मराठा समाजातील काही मंडळी नेते वापरत आहेत. मात्र असा जर शासनाच्या वतीने प्रयत्न झाला तर त्याला आम्ही कडाडून विरोध करु”

ओबीसी विरुद्ध मराठा वाद पेटवण्याचं षडयंत्र सुरू आहे. मराठा समाजाचं राजकारण होतंय, ओबीसी समाजाचं ताट खेचण्याचा प्रयत्न होतोय, 3 तारखेला सर्व तलाठी, तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करू, असा धमकीवजा इशाराच त्यांनी दिला आहे.

या सरकारने मराठा समाजाच्या मागण्या लगोलग मान्य केल्या. सगळ्या वर्गातील मुलं नोकरभरतीची वाट पाहत असताना सरकारने एका समाजासाठी नोकर भरत थांबवली. 13 टक्के जांगांसाठी 87 टक्के जागांची अडवणूक का? असा सवाल करत मराठा समाजाच्या 13 टक्के जागा बाजूला काढून इतर प्रवर्गातील मुलांची भरती करा, असं प्रकाश शेंडगे म्हणाले.

मराठा समाज सांगेल तेच होत असेल तर ओबीसी मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा खणखणीत इशाराही प्रकाश शेंडगे यांनी राज्य सरकारमधील ओबीसी मंत्र्यांना दिला.

(OBC Leader Prakash Shendge Warning Thackeray Government Over Maratha reservation)

संबंधित बातम्या

मराठा समाजाकडून आरक्षणाचा खेळखंडोबा, ओबीसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध : प्रकाश शेंडगे

OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का?; विजय वडेट्टीवारांचा सवाल

SEBC आणि OBC एकच, भाजपने मूर्ख बनवलं, नितीश कुमारांचा जो मुद्दा, तोच माझाही मुद्दा : हरिभाऊ राठोड

काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?.
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप.
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल.
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'.
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी...
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी....
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं.
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.