तर आम्ही मनोज जरांगे पाटील यांना करारा जवाब देऊ, जरांगेंना कोणी दिला इशारा

महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी समाजात वितुष्ट निर्माण झाले आहे. ओबीसीचे नेते छगन भुजबळ आता शांत झाले आहेत. तर मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे आता काय करतायत याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

तर आम्ही मनोज जरांगे पाटील यांना करारा जवाब देऊ, जरांगेंना कोणी दिला इशारा
Follow us
| Updated on: Aug 18, 2024 | 6:06 PM

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्‍यांनी पुढे येऊन सांगावे की ओबीसीच्या आरक्षणाला जराही धक्का लागणार नाही. मुख्यमंत्री महोदय तुम्ही एका जातीचे मुख्यमंत्री आहात का ? महाराष्ट्रात 12 करोड जनता राहते, तुम्ही शपथ घेत असताना 12 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतली आहे. अशांतता निर्माण करायची आणि शांतता रॅली काढायची, कोणी अशांतता निर्माण केली ? शांतता रॅली काढतांना तुम्ही शाळा बंद ठेवताय. शांतता रॅली म्हणायचं, गोंडस नाव ठेवायचं आणि ओबीसीच्या नेतृत्वाला शिव्या द्यायच्या, आम्ही ओबीसीमध्ये जन्म घेतला, मग आम्ही अपराध केला का ? या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी द्यावं किंवा जरांगे सारख्या अल्पबुद्धीच्या माणसाने द्यावं असे आवाहन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केले आहे.

भोकर दौऱ्यावर आलेल्या प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना भोकर हा अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला म्हटला जातो असे विचाराता ते म्हणाले की बालेकिल्ला कोणाचा आहे म्हणून आम्ही आलेलो नाही, आम्ही ओबीसी बांधवांना साद घालण्यासाठी आलो आहोत. 288 आमदार, आजी -माजी आमदार, खासदार यांना ओबीसी बांधवांनी प्रेम दिलं, मात्र ओबीसीच्या बाजूने आज कोणी बोलत नाही अशी खंत हाके यांनी व्यक्त केली. जरांगे पाटील यांनी बैठक घेतली आहे त्याविषयी विचारता ते म्हणाले की कोण आहेत जरांगे पाटील ? संत महंत आहेत ? जरांगे पाटलांना महाराष्ट्र कळतो का ? जरांगे पाटलांना 18 पगड जाती आलूतेदार बलुतेदार कळतात का ? जरांगे पाटलांनी 288 उमेदवार उभे करावेत आम्ही त्यांना करारा जवाब देऊ असे आवाहन देखील लक्ष्मण हाके यांनी यावेळी दिले.

मीनल खतगावकर, संगीता ठोंबरे, राजेंद्र मस्के यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे याबद्दल विचारले असता ते म्हणाले की ज्यांना आमदारकीचे डोहाळे लागले त्यांनी तिकडेच जावं. आमच्या ओबीसीमध्ये नवीन होतकरू चेहरे पुढे येतील, त्यामुळे आमदार खासदारांना शुभेच्छा, तुम्ही तिकडे जावा. आमची महाराष्ट्रात एकच घोषणा आहे ‘नवे पर्व ओबीसी सर्व’  असेही हाके यांनी स्पष्ट केले.

विधानसभेला किती उमेदवार उभे करणार?

जे उमेदवार निवडून येतील त्या लोकांना आम्ही सपोर्ट करू, जिथे आमच्या लोकांना डावलले जाईल तेथे आमचे उमेदवार उभे राहतील. जास्तीत जास्त लोक सभागृहात कसे जातील, त्यांना आम्ही सपोर्ट करू.आम्ही ज्यांना सहकार्य करू ते ओबीसी असतील त्यानंतर एससी, एसटी समाजातील असतील असेही हाके यावेळी म्हणाले.आपण स्वतः निवडणूक लढवणार नाही, पण महाराष्ट्रातील ओबीसी बांधव निश्चित रणांगणात उतरेल आणि रिझल्ट देईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.