नोकरी शोधताय? पुण्यातील टेक सेंटरमध्ये नव्या 1000 इंजिनिअर्सच्या जागांची भरती

कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र नोकरीच्या संधी कमी झाल्या असताना पुण्यात मात्र नव्याने 1,000 नोकरीच्या संधी तयार होणार आहेत.

नोकरी शोधताय? पुण्यातील टेक सेंटरमध्ये नव्या 1000 इंजिनिअर्सच्या जागांची भरती
Follow us
| Updated on: Oct 18, 2020 | 11:21 PM

पुणे : कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र नोकरीच्या संधी कमी झाल्या असताना पुण्यात मात्र नव्याने 1,000 नोकरीच्या संधी तयार होणार आहेत. ऑनलाईन कॅब बुकिंग सेवा देणाऱ्या ओला (Ola) कंपनीने पुण्या एक नवं टेक्नॉलॉजी सेंट उभारण्याचा आणि पुढील काही वर्षात तेथे जवळपास 1,000 इंजिनिअर्सला रोजगार देण्याची योजना आखली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओलाचं भारतात बंगळुरुनंतर पुण्यातील हे दुसरं टेक सेंटर असेल (Ola to set up new Tech centre in Pune will hire 1000 engineers).

पुण्यातील या टेक सेंटरच्या माध्यमातून ओला ग्रुपसाठी जागतिक आणि स्थानिक स्तरावरील तांत्रिक उपाययोजना केल्या जाणार आहेत. पुणे फॅसिलिटी पुढील 3 महिन्यात सुरु होईल आणि पुढील 3 वर्षात 1000 कुशल तंत्रज्ञांना रोजगार उपलब्ध करेल, अशी माहिती कंपनीशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिली आहे.

मागील वर्षी जूनमध्ये ओलाने इलेक्ट्रिक आणि कनेक्टेड व्हेईकलच्या कामात गती आणण्यासाठी सॅन फ्रॅन्सिस्को बेमध्ये एक अॅडव्हान्स टॅक्नॉलॉजी सेंटर सुरु केलं होतं. पुणे देखील आपल्या तांत्रित नैपुण्य आणि प्रतिभेसाठी ओळखलं जातं. तसेच आयटी हब असलेल्या पुण्यात आयटी इंफ्रास्ट्रक्चर देखील उपलब्ध आहे. त्यामुळेच पुणे ओलासारख्या तंत्रज्ञानाशी संबंधित कंपन्यांसाठी पहिल्या पसंतीचं ठिकाण आहे.

ओलामध्ये (Ola) जवळपास 4,000 कर्मचारी आहेत. यात जवळपास 1,500 कर्मचारी इंजिनिअर्स आहेत. कोरोना विषाणूच्या साथीरोगामुळे (Coronavirus Pandemic) ओलाने मध्यंतरी 1,400 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं होतं. ओलाची प्रतिस्पर्धी कंपनी उबरने (Uber) देखील 600 कर्मचाऱ्यांची कपात केली होती.

उबरही नव्या नोकरीच्या संधी देणार

ओलाची प्रतिस्पर्धी कंपनी उबरने देखील भारतात आपल्या इंजिनिअरिंग टीमला मजबूत करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी उबरने अ‍ॅमेझॉनचे दिग्गज तंत्रज्ञ मणिकंदन थंगरत्नम यांची बंगळुरुमध्ये नियुक्ती केली. त्यांच्याकडे सर्व रायडर आणि प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग टीमचं नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय, अमेरिकेतील या कंपनीने भारतात 140 इंजिनिअर्सच्या भरतीच्या घोषणे व्यतिरिक्त आणखी 85 इंजिनिअर्सची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा :

कोव्हिड तर निमित्त, मोदी सरकारला सरकारी कार्यालयं कर्मचारीमुक्त करायची आहेत : राहुल गांधी

Maha Job App | मुख्यमंत्र्यांकडून ‘महाजॉब्स’ ॲप लाँच, Log in कसे कराल?

Government Job 2020: बँक, पोलीस, पोस्ट विभागांमध्ये देशभरात 28000 पदांसाठी बंपर भरती

Ola to set up new Tech centre in Pune will hire 1000 engineers

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.