वयोवृद्ध दाम्पत्य रक्ताच्या थारोळ्यात, कोरोना चाचणीसाठी घरी गेलेल्या अधिकाऱ्यांसमोर थरारक दृश्य

रावेर तालुक्यातील रोझोदा येथे वयोवृद्ध जोडप्याचा खून झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

वयोवृद्ध दाम्पत्य रक्ताच्या थारोळ्यात, कोरोना चाचणीसाठी घरी गेलेल्या अधिकाऱ्यांसमोर थरारक दृश्य
Follow us
| Updated on: Sep 10, 2020 | 6:52 PM

जळगाव : रावेर तालुक्यातील रोझोदा येथे वयोवृद्ध जोडप्याचा खून झाल्याची (Old Couple Murder In Raver) खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चोरीच्या उद्देशाने या जोडप्याचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलीस खुनाच्या कारणांचा शोध घेत आहेत (Old Couple Murder In Raver).

रोझोदा येथील ओंकार पांडुरंग भारंबे (वय 90) आणि सुमनबाई ओंकार भारंबे (वय 85) हे वयोवृद्ध जोडपे राहात होते. त्यांची दोन्ही मुले मुंबईत नोकरीस आहेत. या जोडप्याच्या शेजारी कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जोडप्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी खिरोदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय पथकाने सकाळी दहाच्या सुमारास आले. त्‍यांनी दाम्‍पत्‍याचे दार ठोठावले असता आतून कोणत्‍याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही.

पथकाने दार उघडताच समोर ओंकार भारंबे त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. तेव्हा हा प्रकार उघडकीला आला. तर सुमन भारंबे यांचा मृतदेह स्वयंपाक घराच्या गॅसच्या ओट्याजवळ आढळून आला. सुमन भारंबे यांच्या अंगावर दागिने आढळून आले नाहीत. यामुळे चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्यांनी हा खून केल्‍याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे (Old Couple Murder In Raver).

घटनेचे वृत्त कळताच जिल्हा पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या वृद्ध जोडप्याचा तिक्ष्ण हत्याराने खून केल्याचे आढळून आले. खुनाचे नेमके कारण काय असावे याचा शोध घेतला जात आहे.

Old Couple Murder In Raver

संबंधित बातम्या : 

नागपुरात ऑनलाईन देहविक्रीचा व्यवसाय, दोघांना अटक, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरु

बुलडाण्यात दहा रुपयांच्या उधारीसाठी दारु विक्रेत्याने एकाला पेट्रोल टाकून जिवंत पेटवलं, गुन्हा दाखल

मुंबईत वृद्धेची धारदार शस्त्राने हत्या, 19 तोळे सोने लंपास, पुतण्या ताब्यात

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.