दीड महिन्याच्या बाळाचे अपहरण, मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ

न्यू प्रभात कॉलनी येथे अपहरण केलेल्या चिमुकल्याचा मृतदेह घरातल्याच विहिरीत अढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Amravati child found dead)

दीड महिन्याच्या बाळाचे अपहरण, मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 4:44 PM

अमरावती : न्यू प्रभात कॉलनी येथे अपहरण केलेल्या बाळाचा मृतदेह ( child found dead) घरातल्याच विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. दरम्यान, विहिरीत मृत अवस्थेत आढळलेले बाळ फक्त दीड महिन्यांचे असल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (one and half month child found dead in well in Amravati)

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (29 नोव्हेंबर) मृत बाळाच्या घरातील काही सदस्य लग्न समारंभात गेले होते. ही संधी साधत अज्ञातांनी बाळाचे अपहरण केले. बाळ गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबातील व्यक्तींनी बाळाचा शोध घेतला. मात्र, ते न सापडल्याने कुटुंबाने शहरातील राजापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेथे त्यांनी बाळाच्या अपहरणाची तक्रार दाखल केली.

कुटुंबीयांनी तक्रार दाखल करताच पोलिसांनी तपास सुरु केला. बाळाचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकाने डॉग स्कॉडचीदेखील मदत घेतली. मात्र बाळ न सापडल्याने सर्वच हैराण झाले. दरम्यान दुसऱ्या दिवशी (30 नोव्हेंबर) बाळाचा मृतदेह घरातीलच विहिरीत आढळल्याने एकच खळबळ ऊडाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बाळाचे अपहरण आणि मृत्यूचे गूढ उलगडण्यासाठी काही पुरावा मिळतो का याची चाचपणी केली. यावेळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. (one and half month child found dead in well in Amravati)

दरम्यान, घरातल्या विहिरीतच बाळाचा मृतदेह आढल्याने या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. पोलिसांनी याविषयी तक्रार नोंदवून घेतली आहे. त्यांच्याकडून पुढील तपास सुरु आहे.

संबंधित बातम्या :

बंगालमधून फसवून आणून चिपळूणमध्ये वेश्या व्यवसाय, दोन मुलींची थरारक सुटका

खंडणी न दिल्यास विकेट काढण्याची धमकी, चाकणमध्ये माथाडी संघटना अध्यक्षासह पाच जण गजाआड

भिवंडीत अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन बलात्कार, नागरिकांचा रस्त्यावर उतरुन संताप

(one and half month child found dead in well in Amravati)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.