सांगलीतील व्यक्तीचा रिपोर्ट मुंबईत पॉझिटिव्ह, डॉक्टर, ड्रायव्हरसह 24 जण क्वारंटाईन

| Updated on: Apr 13, 2020 | 10:00 AM

सांगली जिल्ह्यातील रेठेधरणमधील एका व्यक्तीची कोरोना चाचणी (Mumbai Corona patient positive)  मुंबईत पॉझिटिव्ह आली.

सांगलीतील व्यक्तीचा रिपोर्ट मुंबईत पॉझिटिव्ह, डॉक्टर, ड्रायव्हरसह 24 जण क्वारंटाईन
Follow us on

सांगली : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली (Mumbai Corona patient positive)  आहे. सांगली जिल्ह्यातील रेठेधरण परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या संपर्कातील 24 जणांना मिरजमधील रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे. यात त्याच्यावर उपचार केलेला डॉक्टरचाही समावेश आहे.

सांगली जिल्ह्यातील रेठेधरणमधील एका व्यक्तीची कोरोना चाचणी (Mumbai Corona patient positive)  मुंबईत पॉझिटिव्ह आली. हा व्यक्ती मूळ सांगलीतील आहे. हा व्यक्ती मुंबईला जाण्यापूर्वी तो आजारी होता. त्यावेळी त्याच्यावर इस्लामपूरमधील एका डॉक्टरने उपचार केले. यानंतर तो मुंबईला आला.

त्यानंतर मुंबईला येऊन त्याने कोरोनाची चाचणी केली. या चाचणीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर रेठेधरणातील संपर्कातील 24 जण मिरजेतील रुग्णालयात दाखल केले. या 24 जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहे.

विशेष म्हणजे मुंबईला जाण्यापूर्वी त्या व्यक्तीवर उपचार केलेल्या इस्लामपूरमधील एका डॉक्टरला होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे. तसेच या व्यक्तीला मुंबईला सोडून आलेल्या ड्रायव्हरचीही तपासणी केली जाणार आहे.

तसेच हा व्यक्ती सांगली जिल्ह्यातील रेठेधरण गावात जाऊन आला होता. त्यामुळे हे गावही सील करण्यात आलं आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1982 वर पोहचली आहे. काल (12 एप्रिल) कोरोनाच्या 221 नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत उपचारानंतर 217 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेलं ठिकाण म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबई. एकट्या मुंबईत आतापर्यंत 1298 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 92 जणांचा मृत्यू झाला आहे. काल मुंबईत आत्तापर्यंतची सर्वाधिक 16 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच 217 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली (Mumbai Corona patient positive)  आहे.