दररोज 4 हजार भाविकांना मिळणार तुळजाभवानीचे दर्शन, ऑनलाईन पाससह ऑफलाईन पास व्यवस्था, 16 तास मंदिर खुले राहणार

तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भक्तांना ऑनलाईन बुकींग करावी लागणार असुन दररोज 4 हजार भक्तांना दर्शन देण्याची व्यवस्था मंदिर संस्थानने केली आहे

दररोज 4 हजार भाविकांना मिळणार तुळजाभवानीचे दर्शन, ऑनलाईन पाससह ऑफलाईन पास व्यवस्था, 16 तास मंदिर खुले राहणार
तुळजापूर मंदिर
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 9:49 AM

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरांसह राज्यातील मंदिरे व धार्मिक स्थळे भक्तांना दर्शनासाठी खुली करण्यात येणार असून त्या अनुषंगाने तुळजापूर येथील मंदिरात तयारी करण्यात येत आहे. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भक्तांना ऑनलाईन बुकींग करावी लागणार असुन दररोज 4 हजार भक्तांना दर्शन देण्याची व्यवस्था मंदिर संस्थानने केली आहे. त्यात 1 हजार पेड दर्शन पास तर 3 हजार मोफत दर्शन पास उपलब्ध असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. ऑनलाइन पास सोबतच ऑफलाईन पास सुद्धा भाविकांना मंदिर परिसरात काढता येणार आहेत. (Online Booking And Offline Pass Tujlabhavani Mandir in Tuljapur)

तुळजाभवानी मंदिर परिसरात असलेल्या कार्यालयात मोफत पास पद्धतीची व्यवस्था करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिरात पहाटे 5 पासून रात्री 9 वाजेपर्यंत या 16 तासांच्या काळात भाविकांना दर्शन घेता येणार आहे. कोरोना संक्रमण टाळण्यासाठी तुळजाभवानी मंदिरात वारंवार साफसफाई, स्वच्छता व सॅनिटायझरची व्यवस्था केली जाणार असून दर 2 तासाला 500 भक्तांना मुखदर्शन दिले जाणार आहे.

65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि 10 वर्षापर्यंतच्या मुलांना, गर्भवती, गंभीर आजारी नागरिकांना मंदिर प्रवेशास व दर्शनासाठी बंदी असणार आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार भाविकांना तुळजाभवानी देवीचे मुखदर्शन दिले जाणार असून दर्शन रांगेत सोशल डिस्टन्सिंगसाठी वर्तुळाकार पट्टे ओढले जाणार आहेत. त्यासाठी किमान 6 फूट अंतर राखले जाणार आहे.

पुजारी, महंत व मानकरी हे तुळजाभवानी देवीच्या सर्व धार्मिक विधी व पुजा सरकारने दिलेल्या कोव्हिड नियमानुसार करतील. भक्तांना तुळजाभवानी देवीच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक, सिंहासन पुजेसह इतर पूजा करता येणार नाहीत. मात्र मुखदर्शन घेता येणार आहे. सामुहिक आरती देखील करता येणार नसून तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यात भक्तांना प्रवेश मिळणार नाही. मंदिर सुरु झाल्याने भाविकांनी एकत्र गर्दी न करण्याचे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर समितीचे व्यवस्थापक तथा तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे.

(Online Booking And Offline Pass Tujlabhavani Mandir in Tuljapur)

संबंधित बातम्या

ऑनलाईन बुकिंग असेल तरच मिळणार विठ्ठलाचं दर्शन, पंढरपूर मंदिरात दररोज 1 हजार भाविकांना प्रवेश

Temple Reopen | राज्यातील मंदिरं उघडण्यासंर्दभातील नियमावली

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.