Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओप्पोचा Reno 8 Lite 5G लाँच, 64MP कॅमेरा अन्‌ 8GB रॅम… भारतात कधी येणार?

ओप्पो कंपनीचा Oppo Reno 8 Lite 5G  स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. हा फोन फक्त एकाच कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असून यात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आले आहे. या फोनमध्ये अनेक चांगले फीचर्सही देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये या फोनबद्दल आकर्षण आहे.

ओप्पोचा Reno 8 Lite 5G लाँच, 64MP कॅमेरा अन्‌ 8GB रॅम... भारतात कधी येणार?
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 2:17 PM

मुंबईः ओप्पोचा (Oppo) Reno 8 Lite 5G या आठवड्यात स्पेनमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन भारतात लाँच झालेल्या Oppo F21 Pro 5G च रिब्रांडेड व्हर्जन (Rebranded version) असून यात अनेक बदल देखील करण्यात आले आहेत. या नवीन स्मार्टफोनमध्ये 64MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याच बरोबर क्वॉलकोम स्नॅपड्रॅगन 695 (Qualcomm Snapdragon 695) प्रोसेसरही देण्यात आले आहे. 128GB स्टोरेजसाठी उपलब्ध असणार आहे. 4500mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग सारखी वैशिष्ट्ये फोनमध्ये उपलब्ध आहेत. स्मार्टफोन IPX4 प्रमाणपत्रांसह प्रमाणित आहे. फोन स्प्लॅश आणि डस्ट प्रूफ आहे. या नवीन स्मार्टफोनच्या फीचर्स आणि किंमतीबाबत अधिक माहिती घेऊया…

Oppo Reno 8 Lite 5G किंमत

Oppo चा हा फोन फक्त एकाच कॉन्फिगरेशनमध्ये येतो. हँडसेटच्या 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 429 युरो म्हणजे सुमारे 35,700 रुपये आहे. तुम्ही ब्लॅक आणि रेनबो कलर पर्यायांमध्ये Oppo Reno 8 Lite 5G ची खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन कंपनीच्या ई-स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. दरम्यान, संध्या भारतात याच्या स्मार्टफोनच्या लाँचिंगबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

काय असणार स्पेसिफिकेशन्स?

ड्युअल सिम सपोर्ट असलेला Oppo Reno 8 Lite 5G स्मार्टफोन Android 11 वर आधारित ColorOS 12.1 वर काम करतो. यात 6.43 इंचाचा AMOLED डिसप्ले असून तो, 60Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. फोनमध्ये Adreno 619 GPU सह Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर देण्यात आला आहे.

8GB रॅम आणि 128GB स्टोरेज

स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येते. ऑप्टिक्सबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये 64MP प्राइमरी कॅमेरा लेंस देण्यात आली आहे. याशिवाय 2MP चे इतर दोन लेंसही उपलब्ध आहेत. फ्रंटमध्ये कंपनीने 16MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. सुरक्षेसाठी, यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. डिव्हाइस 4500mAh बॅटरीद्वारे सपोर्टीव्ह असून ती 33W चार्जिंगला सपोर्ट करते. दरम्यान, भारतात अद्याप या स्मार्टफोनच्या लाँचिंगची तारीख ठरविण्यात आली नसली तरी लवकच हा फोन ग्राहकांच्या भेटीला येइल अशी अपेक्षा आहे. ओप्पोच्या या नवीन स्मार्टफोनबाबत ग्राहकांमध्येही उत्सूकता दिसत आहे.

वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.