तनिष्क ज्वेलर्सच्या जाहिरातीवरुन वाद, सोशल मीडिया ट्रोलिंगनंतर जाहिरात हटवली
तनिष्कने आपली जाहिरात यूट्यूबवर अपलोड करताच या जाहिरातीला जनतेतून प्रचंड विरोध झाला आहे. ट्विटरवर तनिष्कला बायकॉट करण्याची मोहीम राबवली जातेय. (oppose from people to advertisement of Tanishq Jewelers uploaded uploaded on youtube)
नवी दिल्ली : पुढील महिन्यातील दिवाळी सण लक्षात घेऊन तनिष्क ज्वेलर्सने तयार केलेल्या जाहिरातीला मोठा विरोध होतोय. तनिष्कने आपली जाहिरात यूट्यूबवर अपलोड करताच, ट्विटरवर तनिष्कला बॉयकॉट करण्यासाठी मोहीम राबवली जातेय. जाहिरातीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे लव्ह जिहादचा अजेंडा समोर रेटला जात आहे, असा अरोप तनिष्क ज्वेलर्सवर केला जात आहे. (oppose from people to advertisement of Tanishq Jewelers uploaded uploaded on youtube)
सणाच्या मुहूर्तावर आभूषणांची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. पुढील महिन्यातील दिवाळी सण लक्षात घेऊन दागिने बनवणाऱ्या मोठमोठ्या ब्रॅंन्डेड कंपन्या तयारीला लागतात. तनिष्कनेही त्यासाठी तयारी केली. तनिष्कने आपल्या दागिन्यांची एक व्हिडिओ जाहिरात तयार करुन, ती यूट्यूबवर अपलोड केली. पण या जाहिरातीला देशाभरातून मोठा विरोध होतोय. ट्विटरवरही बॉयकॉट तनिष्क ज्वेलर्स, असा ट्रेन्ड चालवला जातोय. त्यामुळे सोशल मीडियावरील वाढता विरोध लक्षात घेऊन, तनिष्कला आपली जाहिरात मागे घ्यावी लागली आहे. तनिष्कने ती जाहिरात यूट्यूबवरुन डिलीट केली आहे.
Please @TanishqJewelry also show an ad where a muslim woman celebrates eid with her hindu in-laws.
Also hire few dozen exxtra security guards around your showrooms and offices because that offense generally tends to become deadly. #BoycottTanishq https://t.co/ImACJ3mFEs
— Maddy (@jai_in_) October 12, 2020
जाहिरातीता नेमकं काय आहे ?
तनिष्क ज्वेलर्सच्या जाहिरातीत, एका हिंदू महिलेचे मुस्लिम घरात लग्न झाल्याचे दाखवले आहे. महिलेला दिवस गेल्याने तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असल्याचे जाहिरातीत दाखवण्यात आले आहे. या जाहिरातीत मुस्लिम परिवार हिंदू धर्मपद्धतीनुसार डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करतो. शेवटी गरोदर महिला आपल्या सासूला “मां ये रस्म तो आपके घर में होती भी नहीं है न?” असा प्रश्न करते. यावर सासू, “पर बिटिया को खुश रखने की रस्म तो हर घर में होती है न?” असे उत्तर देते. याच जाहिरातीविरोधात सोशल मीडियावर तनिष्क ज्वेलर्सला बॉयकॉट करा, असा ट्रेन्ड चालवला जातोय.
हिंदू-मुस्लिम मुद्द्यावरुन जनतेने तनिष्क ज्वेलर्सच्या या जाहिरातीला नापसंद केलं आहे. तसेच, या जाहिरातीतून लव्ह जिहादचा प्रचार केला जातोय, असा आरोप सोशल मीडियावर होत आहे. तनिष्कने घडणावळ केलेल्या दागिन्यांना खरेदी न करण्याचे आवाहनही ट्विटरवरुन केले जात आहे.
संबंधित बातम्या :
TRP Scam : बजाजपाठोपाठ पारलेचा मोठा निर्णय, TRP घोटाळ्यातील न्यूज चॅनेलला जाहिराती नाही
TRP scam : मुंबई पोलिसांकडून अनेक जाहिरात कंपनींच्या सीईसोंची चौकशी
(oppose from people to advertisement of Tanishq Jewelers uploaded uploaded on youtube)