प्रेमविवाहाला विरोध, मुलीच्या भावाकडून तरुणाची भररस्त्यात ‘सैराट’ स्टाईल हत्या

बीड : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मुलीच्या भावाने तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार केल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. यात तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. बीडच्या गांधीनगर परिसरात ही घटना घडली. सुमित वाघमारे तरुणाचं नाव आहे. दोन महिन्यांपूर्वीच सुमितचा वर्गातल्या मुलीसोबत प्रेमविवाह झाला होता. हा विवाह मुलीच्या भावाला पसंत नव्हता. त्यामुळे मुलीच्या भावाने मित्रांच्या साथीने सुमितची […]

प्रेमविवाहाला विरोध, मुलीच्या भावाकडून तरुणाची भररस्त्यात 'सैराट' स्टाईल हत्या
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

बीड : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मुलीच्या भावाने तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार केल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. यात तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. बीडच्या गांधीनगर परिसरात ही घटना घडली. सुमित वाघमारे तरुणाचं नाव आहे.

दोन महिन्यांपूर्वीच सुमितचा वर्गातल्या मुलीसोबत प्रेमविवाह झाला होता. हा विवाह मुलीच्या भावाला पसंत नव्हता. त्यामुळे मुलीच्या भावाने मित्रांच्या साथीने सुमितची धारदार शस्त्राने हत्या केली. हत्येनंतर तिन्ही मारेकरी फरार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

समाजात अजून मानसिकता किती विकृत आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. धक्कादायक म्हणजे भररस्त्यात हल्ला केल्यानंतर हा तरुण रक्तबंबाळ स्थितीत पडून होता आणि तरुणी उपस्थितांकडे मदतीची याचना करत होती. पण तिच्या मदतीसाठी कुणीही पुढे आलं नाही.

कोण आहे मृत मुलगा?

सुमित इंजिनिअरिंगला होता

आदित्य इंजिनिअरिंग कॉलेज बीड येथे शिक्षण घेत होता.

मुलगीही त्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती.

मुलगा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा कार्यकर्ता होता.

दीड महिन्यापूर्वी कोर्टात लग्न केलं होतं.

लग्नानंतर सुमितच्या घरच्यांनाही त्रास देण्यात आला. सुमितला हॉटेलमध्ये घेरुन त्रास दिला होता.

हत्येच्या दिवशी सुमित कॉलेजमध्ये परीक्षेसाठी गेला होता.

सुमित आणि त्याची पत्नी सोबत असताना हल्ला झाला.

सुमित आणि त्याची पत्नी रुम घेऊन सोबत राहत होते.

सुमित माजलगाव तालुक्यातील तालखेड येथील रहिवाशी आहे.

मुलगी बीड येथील रहिवाशी होती.

मुलगी श्रीमंत असून सुमितची आर्थिक परिस्थिती डबघाईची होती.

पाहा व्हिडीओ :

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.