‘माझे लेकरु मला परत द्या’ आईच्या हंबरड्यानंतर प्रवीण दरेकरांनाही अश्रू अनावर

सांगलीत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना एका आईचा हंबरडा ऐकून अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.

'माझे लेकरु मला परत द्या' आईच्या हंबरड्यानंतर प्रवीण दरेकरांनाही अश्रू अनावर
Follow us
| Updated on: Oct 21, 2020 | 8:08 PM

सांगली : महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसानंतर राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. याचीच पाहणी करण्यासाठी सांगलीत पोहचलेले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना एका आईचा हंबरडा ऐकून अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. आजच्या सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यात दरेकर यांनी तडवळे गावाला भेट दिली. या गावातील शुभम जाधव हा 22 वर्षाचा तरुण अतिवृष्टीमुळे पाण्यात वाहून गेला. त्यामुळे जाधव यांच्या कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. त्यामुळेच शुभमच्या आईला दुःख अनावर झालं (Opposition leader Pravin Darekar get emotional in Sangli hearing pain of mother).

प्रवीण दरेकर यांनी आज शुभमच्या कुटूंबियांचं सांत्वन केलं. आपलं दु:ख दरेकर यांच्याकडे मांडताना शुभमच्या आईने हंबरडा फोडला.

“माझे लेकरु पाण्यात वाहून गेले. मला माझे पिल्लू परत द्या. माझे लेकरु मला पुन्हा हवे आहे. माझा संसार उध्वस्त झालाय. संसार फाटला, आम्हाला आधार देणारा निघून गेला. पावसाने आमचा घात केला. आमचे भविष्य बरबाद झाले. आता आम्हाला न्याय कोण देणार?” या शब्दात त्या आईने आपली व्यथा दरेकर यांच्याकडे मांडली.

यावेळी आईच्या या व्यथा ऐकून दरेकर यांनाही अश्रू अनावर झाले. विरोधी पक्षनेते दरेकर यांनी संवेदनशीलपणे जाधव कुटुंबियांना धीर दिला. त्यांचा प्रश्न सरकार दरबारी मांडण्याचं आश्वासन दिलं. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जाधव कुटुंबाला न्याय मिळवून देऊ असं वचन दरेकर यांनी यावेळी दिलं. दरेकरांनी यासंदर्भात तेथे उपस्थित असलेल्या तहसिलदारांशी चर्चा केली.

“हा विषय अतिशय संवेदनशील असून याप्रकरणी आपण जिल्हाधिकाऱ्यांशी बोलू व त्यांना लवकर मदत मिळवून देऊ. ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही काळजी करु नका,” या शब्दात दरेकर यांनी त्यांना धीर दिला. अतिवृष्टीमुळे त्यांचं कुटुंब उध्वस्त झालंय, पण अद्यापही कुठलीही शासकीय मदत त्यांना मिळालेली नसल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.

हेही वाचा :

मुख्यमंत्र्यांचा दौरा रेड कार्पेटवर, फडणवीस आणि मी चिखलातून शेतकऱ्यांच्या बांधावर, दरेकरांचं टीकास्त्र

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत, बांधावर जाऊन मंत्री बच्चू कडूंचं आश्वासन

शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊ, प्रवीण दरेकरांचा राज्य सरकारला इशारा

व्हिडीओ पाहा :

Opposition leader Pravin Darekar get emotional in Sangli hearing pain of mother

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.