Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eddie Hassell | ऑस्कर नॉमिनेटेड ‘द किड्स आर ऑल राईट’च्या नायकाची अमेरिकेत हत्या!

30 वर्षांच्या या अभिनेत्याने कार चोरी करण्याऱ्या गुन्हेगारांचा निषेध केला, तेव्हा चोरांनी त्याच्यावर गोळीबार केला.

Eddie Hassell | ऑस्कर नॉमिनेटेड ‘द किड्स आर ऑल राईट’च्या नायकाची अमेरिकेत हत्या!
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 10:56 AM

टेक्सास : हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता एडी हॅसेलची (Hollywood actor Eddie Hassell) अमेरिकेत हत्या करण्यात आली आहे. 30 वर्षांच्या या अभिनेत्याने कार चोरी करण्याऱ्या गुन्हेगारांचा निषेध केला तेव्हा चोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या टेक्सासमध्ये ही घटना घडली. स्थानिक माध्यमांच्या अहवालानुसार एडीच्या मॅनेजरने या घटनेची पुष्टी केली आहे. रविवारी सकाळी एडीसोबत ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती त्याच्या मॅनेजरने दिली आहे.(Oscar nominated film the kids are all right fame Hollywood actor Eddie Hassell killed in America)

सदर घटना कार चोरीच्या उद्देशाने घडल्याचे त्यांच्या मॅनेजरने सांगितले. मात्र, अद्याप या घटनेचा तपास सुरू आहे. टेक्सासमध्ये हा गुन्हा नेमका कुठे कोठे झाला, हे याक्षणी स्पष्ट झालेले नाही. एडी हॅसेल 2010मध्ये प्रदर्शित झालेला ऑस्कर नामांकित चित्रपट ‘द किड्स आर ऑल राइट’ आणि एनबीसी टीव्ही शो ‘सर्फेस’ यातील भूमिकांमुळे प्रसिद्ध होता.

‘द किड्स आर ऑल राइट’ ने दिली प्रसिद्धी

एडी हॅसेलचा जन्म 16 जुलै 1990 रोजी टेक्सासच्या कोर्सिकाना येथे झाला. 2000 आणि 2010च्या दशकात त्याने अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले. 2010मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द किड्स आर ऑल राइट’ या चित्रपटातील ‘क्ले’ या पात्राने त्याला विशेष ओळख मिळवून दिली.  2011च्या ऑस्कर सोहळ्यात ‘किड्स आर ऑल राइट’मधील त्याच्या भूमिकेने सर्वांची मने जिंकली. एनबीसीच्या विज्ञानावर आधारित शो ‘सर्फेस’मध्ये त्याने फिल नान्सची भूमिका केली होती.(Oscar nominated film the kids are all right fame Hollywood actor Eddie Hassell killed in America)

एडी हॅसेल याने हारून सॉर्किनच्या ‘स्टुडिओ 60 ऑन द सनसेट स्ट्रिप’, ‘जिमी किमेल लाइव्ह’, ‘ऑलिव्हर बेन्नेन’, ‘झोन ऑफ आर्केडिया’, ‘टील डेथ’, ‘साऊथलँड’, ‘बोन्स’ अशा बर्‍याच टीव्ही शोमध्ये काम केले होते. .

ऑस्कर नामांकित ‘द किड्स आर ऑल राइट’ या चित्रपटाशिवाय हॅसेलने ‘द फॅमिली ट्री’ हा चित्रपट देखील गाजवला होता. 2013मध्ये प्रदर्शित झालेला स्टीव्ह जॉब्स यांचा बायोपिक ‘जॉब्स’, ‘फॅमिली वीकेंड’, ‘हाऊस ऑफ डस्ट’  या चित्रपटांमध्ये तो महत्त्वाच्या भूमिकेत झळकला होता. त्याच्या ‘बॉम्ब सिटी’ या चित्रपटाला ‘डल्लास आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ सर्वोत्कृष्ट चित्रपट कथेचा पुरस्कार मिळाला होता.

(Oscar nominated film the kids are all right fame Hollywood actor Eddie Hassell killed in America)