गृहराज्यमंत्री सतेज पाटलांचे OSD कोरोना पॉझिटिव्ह, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारीही संपर्कात

| Updated on: Jul 23, 2020 | 7:13 PM

राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या कार्यालयातील विशेष अधिकाऱ्याला (OSD) कोरोना संसर्ग झाला आहे (OSD of Satej Patil tested Corona Positive).

गृहराज्यमंत्री सतेज पाटलांचे OSD कोरोना पॉझिटिव्ह, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारीही संपर्कात
Follow us on

कोल्हापूर : राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या कार्यालयातील विशेष अधिकाऱ्याला (OSD) कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे (OSD of Satej Patil tested Corona Positive). त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलाय. यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यांना उपचारासाठी कदमवाडी परिसरातील डॉक्टर डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागील 15 दिवसांमध्ये संबंधित अधिकारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सर्व बैठकांमध्ये उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्या तपासणी केल्या जात आहेत.

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या कार्यालयातील अनेक लोक संबंधित अधिकाऱ्याच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांच्याही तपासण्या करण्यात येत आहेत. या सर्वाचे स्वॅब नमुने घेण्यात आले आहेत. मात्र, त्याचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. हे अहवाल आल्यानंतरच त्यांच्या संपर्कातील किती जणांना कोरोना संसर्ग झालाय हे स्पष्ट होणार आहे. समर्थकांकडून सतेज पाटील यांच्या आरोग्याविषयी देखील काळजी व्यक्त केली जात आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“कोल्हापुरातही लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांवर घरीच उपचार”

दरम्यान, कोल्हापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे आता पुण्यानंतर कोल्हापूरमध्येही लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांवर घरीच उपचार करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला आहे. शहरातील अशा 2 लक्षणं नसलेल्या रुग्णांवर अशा पद्धतीने घरीच उपचारही देखील सुरु झाले आहेत. स्वतंत्र व्यवस्था असलेल्या रुग्णांना खासगी हॉस्पिटलच्या देखरेखीखाली घरातच उपचार घेता येणार आहेत. ज्यांच्या घरी स्वतंत्र व्यवस्था नाही, अशा रुग्णांची हॉस्पिटलच्या मदतीने हॉटेलमध्येच सोय केली जाणार असल्याची माहिती आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता कोल्हापूर शहरातील खासगी हॉस्पिटल देखील ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. खासगी हॉस्पिटलने देखील चांगला प्रतिसाद दिला असल्याची माहिती कलशेट्टी यांनी दिली. आतापर्यंत 25 खासगी हॉस्पिटलची यादी तयार करण्यात आली आहे. त्यातील 12 हॉस्पिटल ताब्यात घेतल्याचंही आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नमूद केलं.

संबंधित व्हिडीओ :


हेही वाचा :

पुण्यातील लॉकडाऊन हटवणार, मात्र काही निर्बंध राहणार, विकेंडच्या बंधनावरही चर्चा

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको, अमित देशमुख यांच्या कुलगुरुंना सूचना

मास्क न वापरल्यास 1 लाख रुपयांचा दंड, 2 वर्षांची जेल, झारखंडचा मोठा निर्णय

OSD of Satej Patil tested Corona Positive