फडणवीसांकडून ‘लाव रे तो व्हिडीओ’!, जुने दाखले देत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतील 'लाव रे तो व्हीडिओ' चा प्रयोग आज देवेंद्र फडणवीस यांनी केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अद्याप कुठलाही दिलासा मिळालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्या जुन्या वक्तव्याचे दाखले देत त्यांना कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला.

फडणवीसांकडून 'लाव रे तो व्हिडीओ'!, जुने दाखले देत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Oct 20, 2020 | 10:39 AM

उस्मानाबाद:  परतीच्या पावसामुळं मराठवाड्यात खरिप पिकांचं आतोनात नुकसान झालं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची मागणी फडणवीसांसह सर्वच विरोधी पक्ष, विविध संघटना आणि शेतकऱ्यांकडून होत आहे. पण राज्य सरकारकडून अद्याप कुठल्याही स्वरुपाच्या मदतीची घोषणा करण्यात आलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’चा प्रयोग करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. (Devendra Fadnavis on Uddhav Thackeray and Ajit Pawar’s old statements)

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. पण मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातून कुठलाही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही संधी आहे. त्यांनी आपल्या जुन्या मागणीप्रमाणे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी’, अशी खोचक टिप्पणी फडणवीस यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस काळजीवाहू मुख्यमंत्री असताना राज्यात अतिवृष्टीचं संकट ओढावलं होतं. त्यावेळी फडणवीसांनी हेक्टरी १० हजार रुपये मदतीची घोषणा केली होती. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची मागणी केली होती. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांना केलेली मदत पुरेशी नसल्याचं सांगितलं होतं. तोच धागा पकडत देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचे जुने व्हीडिओ दाखवत आपल्या वक्तव्याची आठवण करुन दिली.

राजकारण करु नका, संवेदनशिलता दाखवा- फडणवीस

उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानाचा आढावा घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ही वेळ राजकारण करण्याची नाही. पण मुख्यमंत्र्यांसह सरकारमधील नेतेच राजकीय वक्तव्य करत असतील तर मलाही राजकीय बोलावं लागेल, असं फडणवीस म्हणाले. सत्ताधारी पक्षातील लोकांनी राजकारण न करता संवेदशिलपणा दाखवावा आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी फडणवीसांनी पत्रकार परिषदेत केली.

‘कर्ज काढण्याचा पवारांचा सल्ला योग्यच’

राज्यावर ओढावलेल्या संकटाच्या स्थितीत शेतकऱ्यांना मदत करायची झाल्यास आता सरकारला कर्ज काढावे लागेल, असं मत काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. पवारांचा हा सल्ला योग्यच असल्याचं आज फडणवीस म्हणाले. राज्य सरकार एकूण १ लाख २० हजार कोटी रुपयांचं कर्ज काढू शकतं. राज्यावर सध्या ६० हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. त्यामुळं पवारांच्या सल्ल्यानुसार राज्य सरकारनं कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

‘लाव रे तो व्हिडीओ’ची संकल्पना राज ठाकरे यांची!

लोकसभा 2020 च्या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील मुद्दे जनतेला दाखवून केंद्र सरकारच्या भूमिकेची पोलखोल केली होती. त्याचबरोबर केंद्राच्या अनेक योजनांचा फसलेला प्रयोगही राज ठाकरे यांनी व्हीडिओच्या माध्यमातून जनतेसमोर आणला होता. त्यावेळी राज ठाकरे यांचा ‘लाव रे तो व्हिडीओ’चा प्रयोग लोकांच्या पसंतीस उतरला होता.

संबंधित बातम्या:

देवेंद्र फडणवीसांची नुकसान पाहणी सुरुच, अंधारात लाईट लावून शेतकऱ्यांशी चर्चा

मुख्यमंत्री आले आणि बघून गेले, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर राजू शेट्टींचं टीकास्त्र

मदत मागितली बिघडलं कुठं?; केंद्रातील सरकार हे परदेशातील सरकार नाही; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray and Ajit Pawar’s old statements

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.