School Teachers Corona | उस्मानाबोदत शाळा सुरु होण्याच्या पूर्वसंध्येला 15 शिक्षकांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह

उस्मानाबादेत शाळा सुरु होण्याच्या पूर्वसंध्येला उस्मानाबाद जिल्ह्यातील आणखी 15 शिक्षकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे

School Teachers Corona | उस्मानाबोदत शाळा सुरु होण्याच्या पूर्वसंध्येला 15 शिक्षकांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह
एकूणच, अभ्यासात समोर आलेल्या माहितीनुसार, 83 टक्के लोकांपैकी 81 टक्के लोकांमध्ये कोरोना झाल्यामुळे त्याचा परिणाम डोळ्यांवर झाल्याचं समोर आलं.
Follow us
| Updated on: Nov 22, 2020 | 7:44 PM

उस्मानाबाद : कोरोनामुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा उद्यापासून अखेर सुरु होणार आहेत (Osmanabad School Teachers Corona). या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये शेकडो शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचं दिसून येत आहे. शाळा सुरु होण्यापूर्वीच शिक्षकांना कोरोनाचं ग्रहण लागल्याचं चित्र आहे. उस्मानाबादेत शाळा सुरु होण्याच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील आणखी 15 शिक्षकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे (Osmanabad School Teachers Corona).

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत 70 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, तरीही उद्यापासून शाळा सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात यापूर्वीचे 55 आणि आज नवीन 015 असे एकूण 70 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात 491 शाळा असून त्यात 4 हजार 737 शिक्षक आहेत. 4 हजार 460 शिक्षकांनी कोरोना टेस्ट केली असून त्यातील 4 हजार 390 शिक्षक निगेटीव्ह तर 70 पॉझिटिव्ह आले आहेत. तर 277 शिक्षकांचे कोरोना तपासणी अहवाल अजून येणे बाकी आहे. जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी गजानन सुसर यांनी याबाबतची माहिती दिली (Osmanabad School Teachers Corona).

कोरोना संकट आणि लॉकडाऊमुळे बंद असलेल्या शाळा येत्या 23 नोव्हेंबरपासून (school reopen) सुरु होण्याचा निर्णय ठाकरे सरकारने (Thackeray Sarkar) घेतला आहे. त्यानुसार नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरवण्याचे नियोजन आहे. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने, शाळा उघडण्याबाबत अनेक जिल्ह्यात संभ्रम दिसत आहे.

Osmanabad School Teachers Corona

संबंधित बातम्या :

नाशिकमध्ये 4 जानेवारीपासून शाळा सुरू होणार; तर जळगावमधील शाळांचा निर्णय सोमवारी!

शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर पुनर्विचाराची गरज; बच्चू कडू मुख्यमंत्र्यांना भेटणार

अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.