इम्रान खान किती पुरावे हवे? भारताच्या हातातील 5 भक्कम पुरावे!

इस्लामाबाद/मुंबई:  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुलवामा हल्ल्याला पाकिस्तान जबाबदार नसल्याचं म्हटलं आहे. “स्वत: पाकिस्तान दहशतवादी कारवायांचा सामना करत आहे. त्यामुळे भारतावर हल्ला करुन आम्हाला फायदा काय” असा प्रश्न इम्रान खान यांनी उपस्थित केला. त्याचवेळी त्यांनी पुरावे द्या आम्ही कारवाई करु, अशी वल्गना केली. मात्र इम्रान खान हे खरंच पुरावे दिले तर कारवाई करतील का? […]

इम्रान खान किती पुरावे हवे? भारताच्या हातातील 5 भक्कम पुरावे!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

इस्लामाबाद/मुंबई:  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुलवामा हल्ल्याला पाकिस्तान जबाबदार नसल्याचं म्हटलं आहे. “स्वत: पाकिस्तान दहशतवादी कारवायांचा सामना करत आहे. त्यामुळे भारतावर हल्ला करुन आम्हाला फायदा काय” असा प्रश्न इम्रान खान यांनी उपस्थित केला. त्याचवेळी त्यांनी पुरावे द्या आम्ही कारवाई करु, अशी वल्गना केली.

मात्र इम्रान खान हे खरंच पुरावे दिले तर कारवाई करतील का? कारण यापूर्वी भारतावर झालेला 26/11 हल्ला असो, उरी दहशतवादी हल्ला असो, पठाणकोट हल्ला असो किंवा भारताच्या सीमेवरील कोणतीही दहशतवादी कारवाई असो,  या सर्व कारवायांची तार पाकिस्तानपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे इम्रान खान पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे पुरावे कोणत्या तोंडाने मागत आहेत, असा प्रश्न आहे.

पाकिस्तानच्या तोंडावर फेकण्यासाठी एकच पुरावा पुरेसा आहे. तो म्हणजे दहशतवाद्यांचा मसिहा अजहर मसूद. कंदहार विमान अपहरण प्रकरणी पाकिस्तानने भारताच्या ताब्यातील अजहर मसूदच्या सुटकेची मागणी केली होती. तोच अजहर मसूद सध्या पाकिस्तानमध्ये उजळ माथ्याने फिरत आहे. त्यामुळे इम्रान खान यांनी भारताकडे पुरावा मागण्यापूर्वी त्याची तरी तमा बाळगायला हवी होती.

पाकिस्तानने पुरावे मागितले, हे पाच पुरावे पुरेसे नाहीत का?

1) संसद हल्ला

जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचं मुख्यालय पाकिस्तानात आहे. या संघटनेची स्थापना अजहर मसूदनेच केली होती. काश्मीर स्वतंत्र करणं हा त्यांचा हेतू. त्यामुळेच जैशकडून काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया  केल्या जातात.  2001 मध्ये भारताच्या संसदेवर हल्ला याच संघटनेने केला होता.

2) मुंबई 26/11 हल्ला

मुंबईवर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेने केला होता. इतकंच नाही तर या हल्ल्यातील अजमल कसाब या दहशतवाद्याला भारताने जिवंत पकडलं होतं. या हल्ल्यावेळी सर्व दहशतवाद्यांना पाकिस्तानातून सूचना मिळत होत्या. हा सर्व खेळ जगाने पाहिला होता.

या हल्ल्याचा मास्टरमाईंड झकीऊर रहमान लखवी हा पाकिस्तानातच आहे. तर भारतातील सर्व कारवाया प्रत्यक्षात उतरवणारा हाफिज सईदला नजरकैदेत ठेवलं होतं. मात्र काहीच दिवसात तो उजळ माथ्याने फिरु लागला.

3) दाऊद इब्राहिम

भारतातील मोस्ट वाँटेड गुन्हेगार दाऊद इब्राहिम हा  पाकिस्तानात लपला आहे. त्याचे अनेक पुरावे भारताने दिले आहेत. मात्र दाऊदला पाकिस्तानने आसरा दिला आहे.

4) कंधहार विमान अपहरण 

जम्मू काश्मीरमध्ये 40 सीआरपीएफ जवानांचे जीव घेणाऱ्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहर पाकिस्तानमध्ये मोकाट फिरतोय. या संघटनेला पाकिस्तानकडूनच बळ दिलं जातं. मसूद अजहर जेव्हा भारताच्या हाती लागला तेव्हा त्याला सोडावं लागलं होतं. कारण, दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण करुन मसूद अजहरला सोडण्याची मागणी केली होती. 176 प्रवाशांना ओलीस ठेवून मसूद अजहरची दहशतवाद्यांनी सुटका करुन घेतली होती. हाच मसूद सध्या पाकिस्तानात आहे, यापेक्षा मोठा पुरावा इम्रान खान यांना कोणता हवा?

5) पुलवामा, पठाणकोट, उरी हल्ला

नुकता पुलवामा इथं झालेल्या हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद या संघटनेने स्वीकारली आहे. या संघटनेचं मुख्यालय पाकिस्तानात आहे. त्यामुळे जगभरातून पाकिस्तानवर छी थू होत आहे. केवळ भारतच नाही तर जगभरातून पाकिस्तानच्या जैस ए मोहम्मद असो किंवा लष्कर ए तोयबा या संघटनेवर कारवाई करण्यासाठी दबाव आहे. मात्र इम्रान खान भारताकडेच पुरावे मागत आहेत.

याआधी पठाणकोट हवाईतळावर दहशतवादी हल्ला झाला होता. हा हल्ला जैश ए मोहम्मद यांच्या दहशतवाद्यांनी केला होता. तर उरी इथे झोपलेल्या जवानांवर भ्याड हल्ला करण्याचा कारनामा जैशच्या अतिरेक्यांनीच केला होता.

पुरावेच द्यायचे झाले तर एका एका घटनेचे हजारो पुरावे भारताकडून पाकिस्तानला दिले जाऊ शकतात. पण दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या पाकिस्तानने स्वत:च्या घरात डोळे उघडून पाहिल्यास, त्यांना पुराव्यांची गरज भासणार नाही. दहशतवाद मुळासकट उपटायचा असेल, तर पाकिस्ताननेच ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. जगभरातील असंख्य देश भारताच्या पाठिशी असताना, केवळ आपलीच छी थू का होत आहे, याचा विचार केल्यास, पाकिस्तानला पुराव्यांची गरज भासणार नाही.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.